Shubman Gill, IND vs WI 1st ODI Live Updates : शुबमन गिलची दमदार कामगिरी, विराट कोहलीच्या विक्रमाला दिलं आव्हान; गब्बरसोबत शतकी भागीदारी

India vs West Indies 1st ODI Live Updates : वेस्ट इंडिजने पहिल्या वन डे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 08:22 PM2022-07-22T20:22:03+5:302022-07-22T20:24:57+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 1st ODI Live Updates : Shubman Gill notches up his 1st ODI fifty, become a second Youngest Indian to Score 50+ in WI (ODI), 100 runs partnership with Shikhar dhawan | Shubman Gill, IND vs WI 1st ODI Live Updates : शुबमन गिलची दमदार कामगिरी, विराट कोहलीच्या विक्रमाला दिलं आव्हान; गब्बरसोबत शतकी भागीदारी

Shubman Gill, IND vs WI 1st ODI Live Updates : शुबमन गिलची दमदार कामगिरी, विराट कोहलीच्या विक्रमाला दिलं आव्हान; गब्बरसोबत शतकी भागीदारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 1st ODI Live Updates : वेस्ट इंडिजने पहिल्या वन डे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाची इंग्लंडमधील कामगिरी पाहून विंडीजने या मालिकेसाठी स्टार अष्टपैलू खेळाडूची वन डे संघात निवड केली होती, परंतु सामन्यापूर्वीच त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह  आला आणि त्याला या लढतीतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे विंडीजचे टेंशन वाढले आहे. भारतीय संघ मागील १६ वर्षांत वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे मालिका हरलेला नाही. क्विन्स पार्कवर २०११पासून भारतीय संघ पराभूत झालेला नाही. येथे झालेल्या ८ लढतींत भारताने विजय मिळवला आहे.   

रवींद्र जडेजा पहिल्या दोन वन डे सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे आणि श्रेयस अय्यरकडे उप कर्णधारपद सोपवले गेले आहे. शुबमन गिल व शिखर धवन सलामीला येणार आले आणि त्यांनी चौकारांचा पाऊस पाडला. विंडीजच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा भारतीय फलंदाज पुरेपूर फायदा उचलताना दिसले ७ षटकांत ५० धावा फलकावर चढवल्यानंतर शुबमन अधिक आक्रमक खेळ करताना दिसला. दरम्यान, यंदा भारतीय संघाचे नेतृत्व सात जणांनी केले. लोकेश राहुल, विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह व शिखर धवन यांनी २०२२ या कॅलेंडर वर्षात टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे.  यापूर्वी २०१७मध्ये श्रीलंकेने एका कॅलेंडर वर्षात ७ कर्णधार बदलले होते. 

शुबमनने ३६ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले. गिलचे हे वन डेतील पहिलेच अर्धशतक ठरले, तर भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा तो ९७वा फलंदाज ठरला. वेस्ट इंडिजमध्ये वन डेत अर्धशतक झळकावणारा शुबमन हा विराट कोहलीनंतर ( २२ वर्ष व २१५ दिवस) दुसरा युवा फलंदाज ठरला. शुबमनचे वय २२ वर्ष व ३१७ दिवस आहे. Youngest Indian to Score 50+ in WI (ODI) भारताने १४ षटकांत फलकावर शतक झळकावले. विंडीजमध्ये वन डेत शतकी भागीदारी करणारी ही भारताची चौथी सलामीवीरांची जोडी ठरली. सौरव गांगुली/सचिन तेंडुलकर ( १९९७), धवन/ रोहित शर्मा ( २०१३), धवन/अजिंक्य रहाणे ( २०१७), धवन/अजिंक्य रहाणे ( २०१७) आणि धवन/गिल ( २०२२) यांनी शतकी भागीदारी केली. 

धवननेही वन डेतील ३६वे अर्धशतक ५३ चेंडूंत पूर्ण केले. शिखर धवन व शुबमन गिल यांची ११९ धावांची भागीदारी संपुष्टात आली. विंडीज कर्णधार निकोलस पूरनच्या अचून थ्रो ने गिलला केले धावबाद केले आणि त्याला ६४ धावांवर माघारी जावे लागले. 

Web Title: IND vs WI 1st ODI Live Updates : Shubman Gill notches up his 1st ODI fifty, become a second Youngest Indian to Score 50+ in WI (ODI), 100 runs partnership with Shikhar dhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.