Join us  

Shubman Gill, IND vs WI 1st ODI Live Updates : चांगला खेळ सुरू असताना कोणाची दृष्ट लागली?; पाहा शुबमन गिलची विकेट कोणाच्या चुकीमुळे पडली, Video 

India vs West Indies 1st ODI Live Updates : युवा खेळाडूंना सोबत घेऊन मैदानावर उतरलेल्या शिखर धवनने भारताला आश्वासक सुरूवात करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 8:55 PM

Open in App

India vs West Indies 1st ODI Live Updates : युवा खेळाडूंना सोबत घेऊन मैदानावर उतरलेल्या शिखर धवनने भारताला आश्वासक सुरूवात करून दिली. शुबमन गिलने ( Shubman Gill) वन डेतील पहिले अर्धशतक झळकावताना गब्बरसह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. पण, १८व्या षटकात या जोडीला नजर लागली अन् शुबमनला माघारी जावं लागलं. गचाळ क्षेत्ररक्षणामुळे आतापर्यंत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी भारतीय फलंदाजांना बरीच मदत केली होती, परंतु त्यांना गृहित धरणे महागात पडले. विंडीजचा कर्णधार निकोलस पूरन ( Nicholas Pooran) याने अप्रतिम क्षेत्ररक्षण करून ११९ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. ( IND vs WI 1st ODI सामन्याचे धावफलक एका क्लिकवर

शुबमन गिल व शिखर धवन सलामीला येणार आले आणि त्यांनी चौकारांचा पाऊस पाडला. विंडीजच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा भारतीय फलंदाज पुरेपूर फायदा उचलताला. शुबमनने ३६ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले. गिलचे हे वन डेतील पहिलेच अर्धशतक ठरले, तर भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा तो ९७वा फलंदाज ठरला. वेस्ट इंडिजमध्ये वन डेत अर्धशतक झळकावणारा शुबमन हा विराट कोहलीनंतर ( २२ वर्ष व २१५ दिवस) दुसरा युवा फलंदाज ठरला. शुबमनचे वय २२ वर्ष व ३१७ दिवस आहे. 

विंडीजमध्ये वन डेत शतकी भागीदारी करणारी ही भारताची चौथी सलामीवीरांची जोडी ठरली. सौरव गांगुली/सचिन तेंडुलकर ( १९९७), धवन/ रोहित शर्मा ( २०१३), धवन/अजिंक्य रहाणे ( २०१७), धवन/अजिंक्य रहाणे ( २०१७) आणि धवन/गिल ( २०२२) यांनी शतकी भागीदारी केलीधवननेही वन डेतील ३६वे अर्धशतक ५३ चेंडूंत पूर्ण केले. शिखर धवन व शुबमन गिल यांची ११९ धावांची भागीदारी संपुष्टात आली. विंडीज कर्णधार निकोलस पूरनच्या अचून थ्रो ने गिलला केले धावबाद केले आणि त्याला ६४ धावांवर माघारी जावे लागले. त्याच्या खेळीत ६ चौकार व २ षटकारांचा समावेश होता. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजशुभमन गिलशिखर धवन
Open in App