Shikhar Dhawan, IND vs WI 1st ODI Live Updates : अब की बार ४०० पार जाण्याचे स्वप्न भंगले, दमदार सुरुवातीनंतर भारताचे शिलेदार ढेपाळले; विंडीजचा सॉलिड कमबॅक 

India vs West Indies 1st ODI Live Updates : शिखर धवन ( Shikhar Dhawan), शुबमन गिल ( Shubman Gill) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) या आघाडीच्या फलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 10:49 PM2022-07-22T22:49:31+5:302022-07-22T22:51:27+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 1st ODI Live Updates : West Indies need 309 to defeat India in the first ODI. A great comeback in the second half by West Indies  | Shikhar Dhawan, IND vs WI 1st ODI Live Updates : अब की बार ४०० पार जाण्याचे स्वप्न भंगले, दमदार सुरुवातीनंतर भारताचे शिलेदार ढेपाळले; विंडीजचा सॉलिड कमबॅक 

Shikhar Dhawan, IND vs WI 1st ODI Live Updates : अब की बार ४०० पार जाण्याचे स्वप्न भंगले, दमदार सुरुवातीनंतर भारताचे शिलेदार ढेपाळले; विंडीजचा सॉलिड कमबॅक 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 1st ODI Live Updates : शिखर धवन ( Shikhar Dhawan), शुबमन गिल ( Shubman Gill) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) या आघाडीच्या फलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली. यांची फलंदाजी पाहून टीम इंडिया आज ४०० पार धावा सहज उभारेल असेच चित्र दिसत होते. पण, वेस्ट इंडिजचने चांगले कमबॅक केले. निकोलस पूरन ( Nicholas Pooran) ने सुरेख रन आऊट करून गिलला बाद केले आणि त्यानंतर अय्यरचा अफलातून कॅच घेत सामना फिरवला. धवनही शतकापासून ३ धावांनी वंचित राहिला. विंडीजच्या गोलंदाजांनी अखेरच्या १७ षटकांत चांगली गोलंदाजी केली.  


शुबमन गिल व शिखर धवन यांची ११९ धावांची भागीदारी १८व्या षटकात संपुष्टात आली. विंडीज कर्णधार निकोलस पूरनच्या अचून थ्रो ने गिलला केले धावबाद केले आणि त्याला ६४ धावांवर माघारी जावे लागले. धवन व श्रेयस यांनी आक्रमक खेळ केला. धवनला शतकाच्या उंबरठ्यावरून माघारी परतावे लागले. गुदाकेश मोतीएने विंडीजला ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. त्याच्या फिरकीवर कट मारण्याचा प्रयत्न धवनने केला अन् बॅकवर्ड पॉईंटला उभ्या असलेल्या शामर्ह ब्रूक्सने अफलातून कॅच घेतला. धवन ९९ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ९७ धावांवर माघारी परतला. 

गुदाकेश मोतीएनेच श्रेयसची विकेट मिळवून दिली. कव्हरवर उभ्या असलेल्या निकोलस पूरनने हवेत झेपावत एका हाताने चेंडू टिपला. श्रेयस ५७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५४ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव ( १३), संजू सॅमसन ( १२) झटपट माघारी परतले आणि भारताच्या धावगतीचा वेग झपाट्याने संथ होत गेला. १ बाद २१३ वरून पुढील ३९ धावांत भारताने ४ फलंदाज गमावले. रोमारिओ शेफर्डने भारताला पाचवा धक्का दिला. दीपक हुडा व अक्षर पटेल यांनी अखेरच्या काही षटकांत फटकेबाजी करून संघाला ३०० पार नेले. अल्झारी जोसेफने ४९व्या षटकात अक्षर ( २१) व दीपक ( २७)  या दोघांचाही त्रिफळा उडवला. भारताला ७ बाद ३०८ धावा करता आल्या. ३५ षटकांत २ बाद २२५ अशा धावा भारताने केल्या होत्या, परंतु पुढील १५ षटकांत ८३ धावांत ५ फलंदाज गमावले.

Web Title: IND vs WI 1st ODI Live Updates : West Indies need 309 to defeat India in the first ODI. A great comeback in the second half by West Indies 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.