बार्बाडोस : आजपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वन डे मालिकेला सुरूवात होत आहे. पण, या सामन्याच्या पूर्वसंध्येलाच भारताला मोठा झटका बसला आहे. कारण वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज दुखापतीमुळे वन डे मालिकेतून बाहेर झाला आहे. लक्षणीय बाब म्हणजे मुकेश कुमार आजच्या सामन्यातून वन डेमध्ये पदार्पण करत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून यजमान वेस्ट इंडिजच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.
भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या मुकेशची कहाणी
बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारची कहाणी खूप संघर्षमय आहे. त्याचे वडील कोलकात्यात टॅक्सी चालवायचे. खरं तर मुकेशच्या वडिलांना क्रिकेटचा तिरस्कार होता आणि या खेळात नाव कमावण्यासाठी मुकेशकडे फक्त एक वर्ष होते. २००८-०९ मध्ये बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात 'प्रतिभा की खोज' नावाचा कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता. इथेच मुकेश कुमारच्या प्रयत्नाची सुरुवात झाली होती. २५-२५ षटकांच्या सामन्यात मुकेश कुमारने सात सामन्यांत ३४ बळी घेतले. एका वर्षानंतर त्याने बीसीसीआयने आयोजित केलेल्या असोसिएट स्पर्धेत बिहार अंडर-१९ संघाचे प्रतिनिधित्व केले.
वन डे मालिकेचे वेळापत्रक
- पहिली वन डे - २७ जुलै, बार्बाडोस (सायंकाळी ७ वाजल्यापासून)
- दुसरी वन डे - २९ जुलै, बार्बाडोस (सायंकाळी ७ वाजल्यापासून)
- तिसरी वन डे - १ ऑगस्ट, त्रिनिदाद (सायंकाळी ७ वाजल्यापासून)
Web Title: IND vs WI 1st ODI Mukesh Kumar is all set to make his ODI debut for team india, know here
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.