Join us  

IND vs WI, 1st ODI : "इशान किशनची कारकीर्द संपवण्याचा राहुल द्रविडचा प्रयत्न"!, सोशल मीडियावर सुरू झालीय चर्चा, पण का?

India vs West Indies 1st ODI Live Updates : शिखर धवन व शुबमन गिल यांच्या ११९ धावांच्या दमदार भागीदारीनंतर श्रेयस अय्यरने कर्णधारासह वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 9:27 PM

Open in App

India vs West Indies 1st ODI Live Updates : शिखर धवन व शुबमन गिल यांच्या ११९ धावांच्या दमदार भागीदारीनंतर श्रेयस अय्यरने कर्णधारासह वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवली आहे. पण, सोशल मीडियावर #Rahul Dravid ट्रेंड होतोय... भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन ( Ishan Kishan) याची कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न करतोय, असा आऱोप द्रविडवर केला जात आहे. भारत-वेस्ट इंडिज पहिल्या वन डे सामन्यात इशानला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न दिल्याने हा राग व्यक्त होतोय. इशान व ऋतुराज गायकवाड यांना डावलून शुबमन गिलला आज संधी देण्यात आली.  

इंग्लंड दौऱ्यावरील ट्वेंटी-२० संघात इशानचा समावेश होता आणि पहिल्या सामन्यात त्याला ८ धावा करता आल्या होत्या. पम, त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही. अशात विंडीजविरुद्धच्या पहिल्या वन डेत त्याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती.   इशानने आतापर्यंत ३ वन डे व १८ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत.   दरम्यान, शुबमन गिल ६४ धावांवर माघारी परतल्यानंतर शिखर धवन व श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाची धावसंख्या ३३ षटकांत १ बाद २०५ वर नेली आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजराहुल द्रविडइशान किशन
Open in App