Join us  

IND vs WI 1st ODI, Rohit Sharma Yuzvendra Chahal Video: रोहित शर्मा 'ते' एक वाक्य बोलला अन् युजवेंद्र चहलसह दोघांनाही हसू झालं अनावर.. पाहा नक्की असं घडलं तरी काय?

दोघंही खूप गांभिर्याने चर्चा करत असतानाच रोहितच्या तोंडून 'ते' वाक्य आलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 1:38 PM

Open in App

IND vs WI 1st ODI, Rohit Sharma Yuzvendra Chahal Video:भारतीय संघाने वेस्ट इंडिजला ६ गडी राखून पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना केवळ १७८ धावाच करता आल्या. युजवेंद्र चहलने दमदार कामगिरी करत ४९ धावा देत ४ बळी टिपले. महत्त्वाच्या फलंदाजांना माघारी पाठवत त्याने वेस्ट इंडिजचं कंबरडं मोडलं. त्यामुळे चहलला पहिल्या वन डे साठी सामनावीराचा किताब देण्यात आला. त्या मिळालेल्या सन्मानानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने त्याच्याशी गप्पा मारल्या. त्याचा व्हिडीओ BCCI ने शेअर केला. त्या व्हिडीओमध्ये एका गोष्टीवरून दोघांनाही हसू आवरलं नाही.

रोहित-चहलला हसू आवरेना...

रोहित शर्माने चहलचे १०० बळींचा टप्पा पार केल्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन केले. तसेच सामनावीराचा किताबही मिळाल्याबद्दल पाठ थोपटली. तू आमच्या संघासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहेस, तुझी कामगिरी उत्तरोत्तर बहरत राहूदे, अशा सदिच्छाही रोहितने त्याला दिल्या. काही काळ चहल संघाबाहेर होता, त्यावेळी त्याने आपल्या गोलंदाजीवर कशी मेहनत घेतली याबद्दल चहलने थोडी माहिती दिली. परंतु, मुलाखतीच्या शेवटी रोहितने चहलला IPL 2022 Mega Auction ची (मेगा लिलावाची) आठवण करून दिली, त्यावेळी दोघेही हसू लागले. 'तू चांगली कामगिरी केली आहेत. IPL चा लिलाव जवळ आलाच आहे. तुला शुभेच्छा', असं रोहित म्हणाला. त्यावर चहलला आणि रोहित दोघांनाही हसू फुटलं. त्यानंंतर चहलने रोहितचे आभार मानले पण तरीही खूप वेळ ते हसतच राहिले. BCCI ने तो व्हिडीओ ट्वीट केला असून संपूर्ण व्हिडीओ वेबसाईटवर पब्लिश केला आहे. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, युजवेंद्र चहल गेले काही वर्षे RCB संघाकडून खेळत होता. चहलला विराट कोहलीच्या मर्जीतील काही निवडक खेळाडूंपैकी एक मानलं जायचं. पण मेगा लिलावाआधी जेव्हा खेळाडूंना करारमुक्त करण्याची वेळी आली तेव्हा चहलला संघाने सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे आता मेगा लिलावात चहलला एखादा संघ बोली लावून विकत घेणार आहे. चहलसाठी बंगळुरूचा संघही पुन्हा एकदा बोली लावू शकतो. तसेच, इतरही नवे संघ त्याच्यावर डाव खेळू शकतात. चहलने नुकत्याच झालेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की त्याला १५-१७ कोटींच्या बोलीची अपेक्षा नसून ८ कोटींपर्यंतची रक्कम मिळाली तरी तो आनंदी असेल.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मायुजवेंद्र चहलआयपीएल २०२२
Open in App