India vs West Indies 1st ODI Live Updates : शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजवर अवघ्या ३ धावांनी विजय मिळवला. भारताच्या ७ बाद ३०८ धावांचा पाठलाग करताना विंडीजने ६ बाद ३०५ धावांपर्यंत मजल मारली. मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj) अखेरच्या षटकात बाजी पलटवली अन् रोमारिओ शेफर्डची ( Romario Shepherd) झुंज अपयशी ठरली. पण, या विजयाचा खरा नायक सिराज नव्हे, तर संजू सॅमसन ( Sanju Samson) असल्याचा दावा नेटिझन्सकडून केला जात आहे आणि त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओतून ते सिद्धही होतंय...
शिखर धवन ( ९७ ), शुबमन गिल ( ६४) आणि श्रेयस अय्यर ( ५४) यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने ३०८ धावांपर्यंत मजल मारली. ३५ षटकांत २ बाद २२५ अशा धावा भारताने केल्या होत्या, परंतु पुढील १५ षटकांत ८३ धावांत ५ फलंदाज गमावले. प्रत्युत्तरात कायले मेयर्स ( Kyle Mayers ) व शामर्ह ब्रूक्स यांनी ११७ धावांची भागीदारी केली. शार्दूल ठाकूरने ब्रुक्स ( ४६) व मेयर्सला ( ७५) माघारी पाठवले. कर्णधार निकोलस पूरन व ब्रेंडन किंग्स यांनी ५१ व अकिल होसैन व किंग यांनी ५६ धावांची भागीदारी करताना सामना जीवंत ठेवला. रोमारिओ शेफर्ड ३७ व होसैन ३२ धावांवर नाबाद राहिले. विंडीजने ६ बाद ३०५ धावा केल्या.