ठळक मुद्दे क्षेत्ररक्षण करताना राहुलच्या हातून एक मोठी चुक घडली. या चुकीनंतर रोहित शर्मानेही कपाळावर हात मारुन घेतला.
कोलकाता, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : लोकेश राहुलला ट्वेन्टी-20 सामन्याचा स्पेशालिस्ट खेळाडू समजला जातो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात मात्र त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पण क्षेत्ररक्षण करताना राहुलच्या हातून एक मोठी चुक घडली. या चुकीनंतर रोहित शर्मानेही कपाळावर हात मारुन घेतला. त्यामुळे राहुल सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
वेस्ट इंडिजचे शाई होप आणि हेटमायर हे दोघे फलंदाजी करत होते. त्यावेळी एक धाव घेताना दोघांमध्ये योग्य समन्यवय पाहायला मिळाला नाही आणि दोघेही एकाच टोकाकडे धावत गेले. यावेळी दुसऱ्या टोकाला धावचीत करण्याची सुवर्णसंधी होती. चेंडू राहुलच्या हातात होता. त्याने चेंडू फेकण्यासाठी पुरेसा वेळही घेतला होता. तो यष्टीरक्षकापासून लांबही नव्हता. पण राहुलने यावेळी चेंडू फेकला आणि तो यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या डोक्यावरून गेला. त्यावेळी रनआऊटची संधी भारताने गमावली, असे वाटत होते. पण कार्तिकच्या मागे असलेल्या मनीष पांडेने तो चेंडू उडी मारून पकडला आणि रनआऊट केले. या साऱ्या प्रकारानंतर सर्वांनीच राहुलची खिल्ली उडवली.
हा पाहा व्हिडीओ
Web Title: IND vs WI 1st T20: Lokesh rahul Troll on social media caused by 'this' thing
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.