IND vs WI 1st ODI : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज या टी२० मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. Mumbai Indians या IPL संघाकडून खेळणारे दोन खास मित्र कायरन पोलार्ड आणि रोहित शर्मा आपापल्या संघांचे नेतृत्व करणार आहेत. वेस्ट इंडिजने भारताविरूद्ध झालेल्या वन डे मालिकेत सपाटून मार खाल्ला. पण त्या मालिकेत पहिल्या सामन्यानंतर पोलार्ड दुखापतग्रस्त झाला होता. टी२० मालिकेसाठी आता पोलार्डने संघात पुनरागमन केले आहे. संघात येताच पोलार्डने रोहित शर्मा आणि टीम इंडियाला एक इशारा दिला आहे.
"IPL च्या गोष्टी वेगळ्या असतात. आता वेस्ट इंडिजसाठी क्रिकेट खेळण्याची वेळ आहे. सर्वांनीच आपल्या देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्याची ही वेळ आहे. आमच्या संघाने आता खेळात सुधारणा केली आहे. इंग्लंड विरूद्धच्या मालिकेत आम्ही खूप चांगली कामगिरी केली. काही वेळा आमचा डाव फसला. पण खेळाडूंनी हे वेळोवेळी दाखवून दिलं आहे की आम्ही चांगली कामगिरी नक्कीच करू शकतो. आम्ही इंग्लंडच्या संघाला पराभवाची धूळ चारल्याने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे जर आम्ही इंग्लंडला हरवू शकतो तर आम्ही भारतीय संघालाही नक्कीच घाम फोडू शकतो", असा इशारा कायरन पोलार्डने भारतीय संघाला दिला.
दरम्यान, वन डे मालिकेतही पोलार्ड पहिल्या सामन्यात संघाचे कर्णधारपद भूषवले होत. पण त्यानंतर त्या दुखापत झाली आणि तो संघाबाहेर गेला. पोलार्डच्या जागी मग निकोलस पूरनने संघाचे कर्णधारपद सांभाळले. पोलार्ड आता पहिल्या टी२० सामन्याच्या माध्यमातून पुन्हा मैदानात उतरत आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी२० सामना १६ फेब्रुवारी, दुसरा टी२० सामना १८ फेब्रुवारी आणि तिसरा टी२० सामना २० फेब्रुवारील खेळला जाणार आहे.