कोलकाता : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पाहुण्यांचे कंबरडे मोडले. कुलदीप यादवच्या फिरकीसमोर विंडीजच्या फलंदाजांनी गिरकी घेतली. त्यांचा निम्मा संघ पन्नासीच्या आत माघारी परतला होता. मात्र, मनिष पांडे नसता तर हे चित्र दिसले नसते.
वन डे मालिकेत भारतासाठी डोकेदुखी ठरलेली शाय होप आणि शिमरोन हेटमेयर ही जोडी विंडीजला मोठी धावसंख्या गाठून देईल असे वाटत होते. मात्र, या दोघांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवला आणि त्यांना अपयश आले. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर होपने चेंडू मिडविकेटच्या दिशेने चेंडू टोलवला आणि धाव घेतली. त्याचवेळी लोकेश राहुलने चेंडूवर ताबा मिळवला आणि नॉन स्ट्राईक एंडला असलेला हेटमेयर माघारी फिरला. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आले.
राहुलने चेंडू यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या दिशेने भिरकावला, परंतु तो खूपच उंच असल्याने कार्तिक तो पकडू शकला नाही. मनिष पांडे त्वरित मागे आला आणि चेंडू हातात घेत धावबाद केले. होपची ती विकेट भारतासाठी खूप महत्त्वाची ठरली आणि त्यानंतर विंडीजची पडझड सुरू झाली.
Web Title: IND vs WI 1st T20: Thanks to Manish Pandey... otherwise India would have been troubled
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.