कोलकाता : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पाहुण्यांचे कंबरडे मोडले. कुलदीप यादवच्या फिरकीसमोर विंडीजच्या फलंदाजांनी गिरकी घेतली. त्यांचा निम्मा संघ पन्नासीच्या आत माघारी परतला होता. मात्र, मनिष पांडे नसता तर हे चित्र दिसले नसते.
राहुलने चेंडू यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या दिशेने भिरकावला, परंतु तो खूपच उंच असल्याने कार्तिक तो पकडू शकला नाही. मनिष पांडे त्वरित मागे आला आणि चेंडू हातात घेत धावबाद केले. होपची ती विकेट भारतासाठी खूप महत्त्वाची ठरली आणि त्यानंतर विंडीजची पडझड सुरू झाली.