IND vs WI 1st T20I : युवा संघ आहे, चुका होणारच; असं म्हणून हार्दिक पांड्याने सांगितले मॅच कुठे हरले

India vs West Indies 1st T20I Live Marathi : ५ सामन्यांच्या मालिकेत ०-१ अशा पिछाडीनंतर कर्णधार हार्दिक पांड्याने युवा संघाची पाठराखण केली.  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 12:26 AM2023-08-04T00:26:56+5:302023-08-04T00:28:17+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 1st T20I Live Marathi :  Hardik Pandya said "Young team will make mistakes, that helps to improve as a group in future". | IND vs WI 1st T20I : युवा संघ आहे, चुका होणारच; असं म्हणून हार्दिक पांड्याने सांगितले मॅच कुठे हरले

IND vs WI 1st T20I : युवा संघ आहे, चुका होणारच; असं म्हणून हार्दिक पांड्याने सांगितले मॅच कुठे हरले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 1st T20I Live Marathi : ट्वेंटी-२० क्रमावारीत नंबर १ असलेल्या भारतीय संघाला पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने ४ धावांनी पराभूत केले. १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ९ बाद १४५ धावाच करता आल्या. ५ सामन्यांच्या मालिकेत ०-१ अशा पिछाडीनंतर कर्णधार हार्दिक पांड्याने युवा संघाची पाठराखण केली.  

नंबर १ भारत हरला! युझवेंद्र चहलने मोठा घोळ घातला, कुणाला न सांगता बॅटींगला आला अन्...


ब्रेंडन किंगने ( २८) विंडीजला चांगली सुरुवात करून दिली, परंतु युझवेंद्र चहलने त्याच्या पहिल्याच षटकात दोन्ही सलामीवीर माघारी पाठवले. निकोलस पूरन ( ४१), रोव्हमन पॉवेल ( ४८) यांनी चांगली फटकेबाजी केली. चहल व अर्शदीप यांनी प्रत्येकी दोन, तर कुलदीप यादव व हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. विंडीजला ६ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारता आली. लक्ष्याचा पाठलाग करताना शुबमन गिल ( ३) आणि इशान किशन ( ६) हे झटपट माघारी परतले. तिलक वर्मा (३९) आणि सूर्यकुमार यादव ( २१) यांनी ३९ धावांची भागीदारी केली, परंतु दोघंही १० धावांच्या अंतराने तंबूत परतले.  


हार्दिक व संजू सॅमसन हे फॉर्मात असलेल्या फलंदाजांवर भीस्त होती. होल्डरने १६व्या षटकात हार्दिकचा ( १९) त्रिफळा उडवला. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात संजू १२ धावांवर रन आऊट झाला. अक्षर पटेलही १३ धावांवर बाद झाला. अर्शदीप सिंगने सलग २ चौकार खेचून मॅचमध्ये रोमांच आणला. ६ चेंडूंत १० धावा हव्या असताना कुलदीप त्रिफळाचीत झाला. पण, भारत ४ धावांनी कमी पडला. अर्शदीप १२ ( ७ चेंडू) धावांवर रन आऊट झाला. भारताला ९ बाद १४५ धावा करता आल्या.  


हार्दिक पांड्या म्हणाला...
आम्ही लक्ष्याचा योग्य पाठलाग करत होतो. पण, आम्ही काही चुका केल्या आमि त्याचा फटका बसला, परंतु ठिक आहे हे होत राहतं. युवा संघ आहे आणि त्यांच्याकडून चुका होणारच. संपूर्ण सामन्यावर आम्ही पकड घेतली होती. माझा नेहमीच विश्वास आहे की, ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये जर तुम्ही विकेट गमावल्या, तर धावसंख्येचा पाठलाग करणे कठीण होते. जेव्हा आम्ही सलग दोन विकेट गमावल्या, ते आम्हाला महागात पडले. खेळपट्टीनुसारच आम्ही तीन फिरकीपटूंसह खेळण्याचा निर्णय घेतला. युझवेंद्र आणि कुलदीप यांनी सोबत खेळावं, अशी आमची इच्छा होती. अक्षर पटेलला फलंदाजीसाठी घेतलेलं. मुकेश कुमार व तिलक वर्मा यांनी प्रभावी कामगिरी केली. 

Web Title: IND vs WI 1st T20I Live Marathi :  Hardik Pandya said "Young team will make mistakes, that helps to improve as a group in future".

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.