भारतीय संघासाठी ऐतिहासिक दिवस! २ युवा खेळाडूंचे पदार्पण, पाहा प्लेइंग इलेव्हन 

India vs West Indies 1st T20I Live Marathi : कसोटी व वन डे मालिका जिंकल्यानंतर भारताचा युवा संघ आजपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 07:34 PM2023-08-03T19:34:52+5:302023-08-03T19:35:52+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 1st T20I Live Marathi : Historic moment Team India playing 200th T20I; Tilak Varma and Mukesh Kumar will be making their debut, Check Playing XI  | भारतीय संघासाठी ऐतिहासिक दिवस! २ युवा खेळाडूंचे पदार्पण, पाहा प्लेइंग इलेव्हन 

भारतीय संघासाठी ऐतिहासिक दिवस! २ युवा खेळाडूंचे पदार्पण, पाहा प्लेइंग इलेव्हन 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 1st T20I Live Marathi : कसोटी व वन डे मालिका जिंकल्यानंतर भारताचा युवा संघ आजपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीचा श्रीगणेशः या मालिकेतून करणार आहे. भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध मागील १७ ट्वेंटी-२० पैकी १५ मध्ये विजय मिळवला आहे. भारताचा हा २००वा ट्वेंटी-२० सामना आहे आणि पाकिस्ताननंतर हे द्विशतक साजरा करणारा भारत दुसरा देश ठरला आहे. पाकिस्तानने २२३ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. 

Image
भारताने १ डिसेंबर २००६ मध्ये पहिला ट्वेंटी-२० सामना खेळला होता आणि त्यानंतर २००७मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ मैदानावर उतरला. भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तो वर्ल्ड कप जिंकला होता. भारताने आतापर्यंत १९९ ट्वेंटी-२०त १२७ सामने जिंकले आहेत, तर ६३ मध्ये पराभव झाला आहे. पाकिस्तानने २२३ पैकी १३४ सामने जिंकून, ८० मध्ये हार पत्करली आहे. न्यूझीलंड ( १९३), श्रीलंका ( १७९), वेस्ट इंडिज ( १७९), ऑस्ट्रेलिया ( १७४) व इंग्लंड ( १७३) हे सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने खेळणारे संघ आहेत. 


भारताने आजच्या सामन्यात तिलक वर्मा व मुकेश कुमार यांना पदार्पणाची संधी दिली आहे. मोहम्मद सिराज मायदेशात परतल्यामुळे मुकेशवरील जबाबदारी वाढली आहे.  तिलकने ४६ ट्वेंटी-२० सामन्यांत १४१८ धावा केल्या आहेत आणि आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून मैदान गाजवले आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

Image

भारताच संघ - इशान किशन, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग

 

Web Title: IND vs WI 1st T20I Live Marathi : Historic moment Team India playing 200th T20I; Tilak Varma and Mukesh Kumar will be making their debut, Check Playing XI 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.