India vs West Indies 1st T20I Live Marathi : कसोटी व वन डे मालिका जिंकल्यानंतर भारताचा युवा संघ आजपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीचा श्रीगणेशः या मालिकेतून करणार आहे. भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध मागील १७ ट्वेंटी-२० पैकी १५ मध्ये विजय मिळवला आहे. भारताचा हा २००वा ट्वेंटी-२० सामना आहे आणि पाकिस्ताननंतर हे द्विशतक साजरा करणारा भारत दुसरा देश ठरला आहे. पाकिस्तानने २२३ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत.
भारताने आजच्या सामन्यात तिलक वर्मा व मुकेश कुमार यांना पदार्पणाची संधी दिली आहे. मोहम्मद सिराज मायदेशात परतल्यामुळे मुकेशवरील जबाबदारी वाढली आहे. तिलकने ४६ ट्वेंटी-२० सामन्यांत १४१८ धावा केल्या आहेत आणि आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून मैदान गाजवले आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारताच संघ - इशान किशन, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग