Join us  

IND vs WI 1st T20I : वेस्ट इंडिजचे फलंदाजांची फटकेबाजी, पण भारतीय गोलंदाजांनी मॅच गाजवली

India vs West Indies 1st T20I Live Marathi : वेस्ट इंडिजचा संघ ट्वेंटी-२०मध्ये काय कमाल करून दाखवू शकतो याची प्रचिती आली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 9:43 PM

Open in App

India vs West Indies 1st T20I Live Marathi : वेस्ट इंडिजचा संघ ट्वेंटी-२०मध्ये काय कमाल करून दाखवू शकतो याची प्रचिती आली. क्रिकेटच्या या झटपट प्रकारात नाही म्हटले तरी विंडीजचा एक दबदबा राहिला आहे. ब्रेंडन किंग, रोव्हमन पॉवेल व निकोलस पूरन यांनी दमदार फटकेबाजी केली.  भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले, त्यानंतर त्यांच्या धावगतीला ब्रेक लागलेला. पण, उभ्या उभ्या फटके मारणाऱ्या फलंदाजांची फौज असलेल्या विंडीजने भारतासमोर आव्हान उभे केले. अर्शदीप सिंग व युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा पदार्पणात जलवा; अफलातून झेल घेऊन सर्वांना केलं अचंबित, Video 

ब्रेंडन किंगने वाढवलेलं भारतीय संघाचं टेंशन युझवेंद्र चहलने त्याच्या पहिल्याच षटकात कमी केलं. वन डे सामन्यात बाकावर बसून राहिलेल्या चहलने पहिल्या चेंडूवर कायले मेयर्सला ( १) आणि तिसऱ्या चेंडूवर किंगला ( २८) पायचीत केले.  नुकताच MLC मध्ये मुंबई इंडियन्स न्यू यॉर्क संघाला शतक झळकावून जेतेपद पटकावून देणाऱ्या निकोलस पूरनने आल्या आल्या आतषबाजी केली. त्याला जॉन्सन चार्सची ( ७) साथ मिळणे अपेक्षित होती, परंतु कुलदीप यादवने टाकलेला चेंडू त्याने उत्तुंग भिरकावला अन् पदार्पणवीर तिलक वर्माने तितकाच अप्रतिम झेल टिपला. पूरन आणि रोव्हमन पॉवेल यांनी विंडीजचा डाव सावरला, परंतु भारतीय गोलंदाजांनी धावगतीवर चाप लावला होता. ( IND vs WI 1st T20I Live Scorecard

झटपट धावा येत नसल्याने पूरनला चूक करण्यास भाग पडले अन् हार्दिकच्या गोलंदाजीवर त्याने तिलकच्या हाती झेल दिसा निकोलस पूरन ३४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ४१ धावांवर बाद झाला. त्याच षटकात चहलने पॉवेलचा वेगवान झेल सोडला आणि ते भारताला महागात पडले. पॉवेलने हात मोकळे करताना खणखणीत षटकार खेचले.

मुकेश कुमारने १८व्या षटकात टिच्चून मारा करताना केवळ ६ धावा दिल्या. १९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अर्शदीपने भारताला विकेट मिळवून दिली. शिमरोन हेटमायर ( १०) झेलबाद झाला. अर्शदीपने त्या षटकात सलग तीन wide चेंडू टाकले, परंतु पाचव्या चेंडूवर पॉवेलला झेलबाद केले. पॉवेलने ३२ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचून ४८ धावा केल्या. मुकेशने शेवटचे षटकही अप्रतिम टाकले अन् विंडीजला ६ बाद  १४९ धावांवर रोखले. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजयुजवेंद्र चहलअर्शदीप सिंग
Open in App