मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा पदार्पणात जलवा; अफलातून झेल घेऊन सर्वांना केलं अचंबित, Video 

India vs West Indies 1st T20I Live Marathi : वेस्ट इंडिजने पहिल्या ट्वेंटी-२०त नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 08:57 PM2023-08-03T20:57:22+5:302023-08-03T20:58:02+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 1st T20I Live Marathi : Kuldeep Yadav strikes in his first over, Tilak Varma takes a superb running catch, Video | मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा पदार्पणात जलवा; अफलातून झेल घेऊन सर्वांना केलं अचंबित, Video 

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा पदार्पणात जलवा; अफलातून झेल घेऊन सर्वांना केलं अचंबित, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 1st T20I Live Marathi : वेस्ट इंडिजने पहिल्या ट्वेंटी-२०त नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चांगल्या सुरुवातीनंतर युझवेंद्र चहलने यजमानांना तीन चेंडूंत दोन्ही सलामीवीर माघारी पाठवून धक्के दिले. त्यानंतर कुलदीप यादवच्या पहिल्याच षटकात भारताला तिसरी विकेट मिळाली आणि पदार्पणवीर तिलक वर्माने अफलातून झेल घेत सर्वांना अचंबित केले.  ( IND vs WI 1st T20I Live Scorecard


ब्रेंडन किंगने फटकेबाजी करून भारतीय गोलंदाजांचे टेंशन वाढवले होते. अर्शदीप सिंग व मुकेश कुमार यांची चांगली धुलाई केली होती. कर्णधार हार्दिक पांड्याने चौथ्या षटकात फिरकीपटू अक्षर पटेलला आणले. त्यानंतर युझवेंद्र चहलने पाचव्या षटकाच्या पहिल्या व तिसऱ्या चेंडूंवर विंडीजच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. वन डे सामन्यात बाकावर बसून राहिलेल्या चहलने त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विंडीजचा सलामीवीर कायले मेयर्सला ( १) पायचीत केले. तिसऱ्या चेंडूवर चहलने सलामीवीर ब्रेंडन किंगची महत्त्वाची विकेट मिळवून दिले. किंगने १९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह २८ धावांची खेळी केली होती. विंडीजचे दोन्ही सलामीवीर ३० धावांत तंबूत परतले. ( चहलने घेतल्या दोन विकेट्स पाहा व्हिडीओ


नुकताच MLC मध्ये मुंबई इंडियन्स न्यू यॉर्क संघाला शतक झळकावून जेतेपद पटकावून देणाऱ्या निकोलस पूरनने आल्या आल्या आतषबाजी केली. त्याला जॉन्सन चार्सची ( ७) साथ मिळणे अपेक्षित होती, परंतु कुलदीप यादवने टाकलेला चेंडू त्याने उत्तुंग भिरकावला अन् पदार्पणवीर तिलक वर्माने तितकाच अप्रतिम झेल टिपला. 

Web Title: IND vs WI 1st T20I Live Marathi : Kuldeep Yadav strikes in his first over, Tilak Varma takes a superb running catch, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.