IND vs WI 1st T20I : वेस्ट इंडिजने 'करेक्ट' कार्यक्रम केला! भारतावर ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला

India vs West Indies 1st T20I Live Marathi : वेस्ट इंडिजने ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला आरसा दाखवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 11:51 PM2023-08-03T23:51:06+5:302023-08-03T23:52:01+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 1st T20I Live Marathi : Sanju Samson game changing run out, West Indies beat India by 4 runs & take 1-0 lead in five match series | IND vs WI 1st T20I : वेस्ट इंडिजने 'करेक्ट' कार्यक्रम केला! भारतावर ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला

IND vs WI 1st T20I : वेस्ट इंडिजने 'करेक्ट' कार्यक्रम केला! भारतावर ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 1st T20I Live Marathi : वेस्ट इंडिजने ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला आरसा दाखवला. १५० धावांचे लक्ष्य भारतीय संघासाठी अवघड नव्हते, परंतु विंडीजच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली. इशान किशन व शुबमन गिल यांच्या अपयशानंतर भारताने सामन्यात पुनरागमन केले होते. पण, सेट फलंदाज झटपट बाद झाले. संजू सॅमसनचा रन आऊट विंडीजसाठी निर्णायक क्षण ठरला. जेसन होल्डरने ( १-१९) टाकलेल्या १६व्या षटकात  सामना फिरला होता. स्लो ओव्हर रेटमुळे विंडीजला अखेरच्या दोन षटकांत ४ खेळाडू सर्कलबाहेर उभे करावे लागले आणि याचा फायदा अर्शदीप सिंगने उचलला, परंतु भारताचा पराभव तो नाही टाळू शकला. 

०,६,६,०,४! तिलक वर्माची पदार्पणात दमदार सुरूवात, परंतु भारताची लागलीय वाट, Video 


ब्रेंडन किंगने ( २८) विंडीजला चांगली सुरुवात करून दिली, परंतु युझवेंद्र चहलने त्याच्या पहिल्याच षटकात दोन्ही सलामीवीर माघारी पाठवले. निकोलस पूरनने ३४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ४१ धावा केल्या.  रोव्हमन पॉवेलने   ३२ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचून ४८ धावा केल्या. मुकेश कुमार व अर्शदीप सिंग यांनी शेवटच्या षटकांत टिच्चून मारा करताना विंडीजच्या धावगतीला वेसण घातले. चहल व अर्शदीप यांनी प्रत्येकी दोन, तर कुलदीप यादव व हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. विंडीजला ६ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारता आली.


विंडीजच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला.  शुबमन गिल ( ३) आणि इशान किशन ( ६) यांना अनुक्रमे अकिल होसेन व  ओबेड मॅकॉय यांनी बाद केले. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी ३९ धावांची भागीदारी करताना भारताचा डाव सावरला होता, परंतु जेसन होल्डरने ही जोडी तोडली. सूर्यकुमारचा ( २१) अप्रतिम झेल हेटमायरने टिपला. रोमारिओ शेफर्डच्या आखूड चेंडूवर पुलशॉट मारण्याच्या प्रयत्नात तिलक ३९ धावांवर ( २२ चेंडूंत २ चौकार व ३ षटकार ) झेलबाद झाला. तिलक बाद झाला तेव्हा भारताला ५४ चेंडूंत ७३ धावा हव्या होत्या आणि हार्दिक व संजू सॅमसन हे फॉर्मात असलेले फलंदाज खेळपट्टीवर होते. होसेनने ४-०-१७-१ असा सुरेख स्पेल टाकला. 


हार्दिक व संजू यांना नशिबाचीही साथ मिळाली अन् भारताच्या विजयाच्या आशा कायम राहिल्या. संजू मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु बॅट अन् बॉलचा योग्य संपर्क होताना दिसला नाही. मॅकॉयच्या चेंडूवर सूर गवसला अन् खणखणीत षटकार त्याने खेचला. जेसन होल्डरने पुढच्या षटकात हार्दिकचा ( १९) त्रिफळा उडवला. हार्दिकनंतर आता सर्व जबाबदारी संजूवर होती, परंतु चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो १२ धावांवर रन आऊट झाला. कायल मेयर्सचा डायरेक्ट थ्रोने संजूचा करेक्ट कार्यक्रम केला. इथून अक्षर पटेलवर दडपण वाढलेले दिसले. भारताला १२ चेंडूंत २१ धावांची गरज होती. होल्डरने १९ धावांत २ विकेट्स घेत चांगली स्पेल टाकली. मॅकॉयच्या षटकात अक्षर ( १३) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. 


मॅकॉयने २८ धावांत २ विकेट्स घेतल्या. भारताच्या हातातून मॅच गेलीय असे वाटत असताना अर्शदीप सिंगने सलग २ चौकार खेचून मॅचमध्ये रोमांच आणला. ६ चेंडूंत १० धावा भारताला हव्या होत्या, परंतु कुलदीप यादव स्ट्राईकवर होता. रोमारिओ शेफर्डने पहिलाच चेंडू यॉर्कर टाकला अन् कुलदीपचा दांडा उडवला. युझवेंद्र चहलने १ धाव काढून अर्शदीपला स्ट्राईक दिली आणि त्याने २ धावा काढत ३ चेंडू ७ धावा अशी मॅच आणली.  पुढील चेंडू निर्धाव पडला अन् पाचव्या चेंडूवर दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात अर्शदीप १२ ( ७ चेंडू) धावांवर रन आऊट झाला. भारताला ९ बाद १४५ धावा करता आल्या. विंडीजने ४ धावांनी सामना जिंकला.

Web Title: IND vs WI 1st T20I Live Marathi : Sanju Samson game changing run out, West Indies beat India by 4 runs & take 1-0 lead in five match series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.