Join us  

०,६,६,०,४! तिलक वर्माची पदार्पणात दमदार सुरूवात, परंतु भारताची लागलीय वाट, Video 

India vs West Indies 1st T20I Live Marathi : वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी चांगला मारा केलेला पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 10:55 PM

Open in App

India vs West Indies 1st T20I Live Marathi : वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी चांगला मारा केलेला पाहायला मिळत आहे. १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर इशान किशन व शुबमन गिल अपयशी ठरले. सूर्यकुमार यादव  व तिलक वर्मा यांनी डाव सावरला होता, परंतु हेटमायरच्या अप्रतिम झेलने ही जोडी तुटली. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या तिलक वर्माने पहिल्या ५ चेंडूंत आत्मविश्वासाने फटकेबाजी करून विंडीजची झोप उडवली, परंतु सध्या भारताची वाट लागलीय. 

ब्रेंडन किंगने ( २८) विंडीजला चांगली सुरुवात करून दिली, परंतु युझवेंद्र चहलने त्याच्या पहिल्याच षटकात दोन्ही सलामीवीर माघारी पाठवले. नुकताच MLC मध्ये मुंबई इंडियन्स न्यू यॉर्क संघाला शतक झळकावून जेतेपद पटकावून देणाऱ्या निकोलस पूरनने चांगली फटकेबाजी केली.  पूरनने ३४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ४१ धावा केल्या. त्यानंतर रोव्हमन पॉवेलने चांगला खेळ करताना ३२ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचून ४८ धावा केल्या. मुकेश कुमार व अर्शदीप सिंग यांनी शेवटच्या षटकांत टिच्चून मारा करताना विंडीजच्या धावगतीला वेसण घातले. चहल व अर्शदीप यांनी प्रत्येकी दोन, तर कुलदीप यादव व हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. विंडीजला ६ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारता आली. ( IND vs WI 1st T20I Live Scorecard

विंडीजच्या गोलंदाजांनीही चांगली सुरुवात केली. शुबमन गिल ( ३) तिसऱ्या षटकात अकिल होसेनला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात यष्टिचीत झाला. गोलंदाजीत ओबेड मॅकॉयला आणले विंडीजच्या पथ्यावर पडले. इशान किशनला ( ६) घाई महागात पडली अन् भारताने २८ धावांत दुसरी विकेट गमावली. पदार्पणवीर तिलक वर्माने सलग दोन चेंडू सीमापार पाठवले. तिलक आणि सूर्यकुमार यादव यांनी ३९ धावांची भागीदारी करताना भारताचा डाव सावरला, परंतु जेसन होल्डरने ही जोडी तोडली. सूर्यकुमारचा ( २१) अप्रतिम झेल हेटमायरने टिपला अन् भारताला तिसरा धक्का बसला. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजइशान किशनशुभमन गिलसूर्यकुमार अशोक यादव
Open in App