India vs West Indies 1st T20I Live Marathi : वेस्ट इंडिजने पहिल्या ट्वेंटी-२०त नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ब्रेंडन किंगने ताबडतोड फटकेबाजी करून भारतीय गोलंदाजांचे टेंशन वाढवले होते. अर्शदीप सिंग व मुकेश कुमार यांची चांगली धुलाई केली होती. कर्णधार हार्दिक पांड्याने चौथ्या षटकात फिरकीपटू अक्षर पटेलला आणले. त्यानंतर युझवेंद्र चहलने पाचव्या षटकाच्या पहिल्या व तिसऱ्या चेंडूंवर विंडीजच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले.
कसोटी व वन डे मालिका जिंकल्यानंतर भारताचा युवा संघ आजपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीचा श्रीगणेशः या मालिकेतून करणार आहे. भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध मागील १७ ट्वेंटी-२० पैकी १५ मध्ये विजय मिळवला आहे. भारताचा हा २००वा ट्वेंटी-२० सामना आहे आणि पाकिस्ताननंतर हे द्विशतक साजरा करणारा भारत दुसरा देश ठरला आहे.
भारताने आजच्या सामन्यात तिलक वर्मा व मुकेश कुमार यांना पदार्पणाची संधी दिली आहे. मोहम्मद सिराज मायदेशात परतल्यामुळे मुकेशवरील जबाबदारी वाढली आहे. तिलकने ४६ ट्वेंटी-२० सामन्यांत १४१८ धावा केल्या आहेत आणि आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून मैदान गाजवले आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ( IND vs WI 1st T20I Live Scorecard )
वन डे सामन्यात बाकावर बसून राहिलेल्या युझवेंद्र चहलला आज संधी मिळाली आणि त्याने त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विंडीजचा सलामीवीर कायले मेयर्सला ( १) पायचीत केले. तिसऱ्या चेंडूवर चहलने सलामीवीर ब्रेंडन किंगची महत्त्वाची विकेट मिळवून दिले. किंगने १९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह २८ धावांची खेळी केली होती. विंडीजचे दोन्ही सलामीवीर ३० धावांत तंबूत परतले.
Web Title: IND vs WI 1st T20I Live Marathi : Yuzvendra Chahal on fire! 2 wickets in 3 balls for him, he gets both the openers,
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.