IND vs WI, 1st T20I Live Updates : माझ्याकडे बघ ना...!, विराट कोहली भर मैदानात इशान किशनवर भडकला; जाणून घ्या कारण 

India vs West Indies, 1st T20I Live Updates : चार चेंडूंच्या फरकाने भारताला बसले दोन धक्के.. इशान किशन ३५ धावांवर, तर विराट कोहली १७ धावांवर परतला माघारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 10:15 PM2022-02-16T22:15:27+5:302022-02-16T22:15:57+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI, 1st T20I Live Updates : A mix-up between Virat Kohli and Ishan Kishan, but it doesn't cost India, See what happen, Virat Kohli now surpasses Rohit Sharma   | IND vs WI, 1st T20I Live Updates : माझ्याकडे बघ ना...!, विराट कोहली भर मैदानात इशान किशनवर भडकला; जाणून घ्या कारण 

IND vs WI, 1st T20I Live Updates : माझ्याकडे बघ ना...!, विराट कोहली भर मैदानात इशान किशनवर भडकला; जाणून घ्या कारण 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies, 1st T20I Live Updates : रोहित शर्माच्या १९ चेंडूंतील ४० धावांच्या आतषबाजीनंतर विराट कोहली मैदानावर आला आणि त्यानं १३वी धाव घेताच हिटमॅनचा विक्रम मोडला. आता आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट दुसऱ्या स्थानी आला आहे. पण, या सामन्यात विराट हा इशानवर थोडासा भडकलेला दिसला. १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित व इशान ( Rohit Sharma - Ishan Kishan) २९ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. फलकावर ६४ धावा असताना रोहित बाद झाला. 

भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर ब्रेंडन किंग्सने खणखणीत चौकार मारला, परंतु भुवीने कमबॅक करताना पाचव्या चेंडूवर त्याला बाद केले. ७व्या षटकात रोहितनं फिरकीपटू युझवेंद्र चहलला आणले आणि त्याने विकेट घेतली. कायल मेयर्स ४२ धावांवर LBW झाला. पदार्पणवीर रवी बिश्नोईने ११व्या षटकात सामन्याला कलाटणी दिली. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने रोस्टन चेसला ( ४) पायचीत केले आणि त्यानंतर पाचव्या चेंडूवर रोवमन पॉवेल ( २) ला बाद केले. त्याने ४ षटकांत १७ धावा देताना दोन विकेट्स घेऊन पदार्पण अविस्मरणीय बनवले. 

निकोलस पूरन एक बाजून लावून खेळत होता आणि त्याने ३८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण,त्याला हर्षल पटेलने चतुराईने बाद केले. संथ गतीने चेंडू टाकून पटेलने पूरनला झेलबाद केले. पूरन ४३ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला. वेस्ट इंडिजने २० षटकांत ७ बाद १५७ धावा केल्या. किरॉन पोलार्ड २४ धावांवर नाबाद राहिला. प्रत्युत्तरात रोहित व इशान यांनी तुफान सुरूवात केली. ओडीन स्मिथच्या पहिल्याच षटकात रोहितने २२ धावा चोपल्या. त्यात दोन चौकार व दोन षटकार खेचले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७.३ षटकांत ६४ धावांची भागीदारी केली. रोस्टन चेसने ८व्या षटकात रोहितला बाद केले. रोहितने १९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४० धावा केल्या.


विराट का भडकला?
रोस्टन चेसने टाकलेल्या १०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इशान फटका मारण्यापासून चूकला, परंतु चेंडू त्याच्या पॅडलला लागून शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेनं गेला. तोपर्यंत विराटने क्रिज सोडले होते आणि इशानही धाव घेण्यासाठी पुढे आला होता. यष्टिरक्षक निकोलस पूरन आणि चेस थर्ड मॅनवर उभ्या असलेल्या ओडिन स्मिथला चेंडू थ्रो करण्याचे मार्गदर्शन करत होते. स्मिथ एवढा गोंधळला की त्याने चेंडू चेसच्या दिशेनं फेकला, तोपर्यंत विराट पुन्हा क्रिजवर परतला होता. त्यानंतर विराट इशानकडे बघून म्हणाला अरे माझ्याकडे बघ..
 

Web Title: IND vs WI, 1st T20I Live Updates : A mix-up between Virat Kohli and Ishan Kishan, but it doesn't cost India, See what happen, Virat Kohli now surpasses Rohit Sharma  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.