India vs West Indies, 1st T20I Live Updates : रोहित शर्माच्या १९ चेंडूंतील ४० धावांच्या आतषबाजीनंतर विराट कोहली मैदानावर आला आणि त्यानं १३वी धाव घेताच हिटमॅनचा विक्रम मोडला. आता आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट दुसऱ्या स्थानी आला आहे. पण, या सामन्यात विराट हा इशानवर थोडासा भडकलेला दिसला. १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित व इशान ( Rohit Sharma - Ishan Kishan) २९ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. फलकावर ६४ धावा असताना रोहित बाद झाला.
भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर ब्रेंडन किंग्सने खणखणीत चौकार मारला, परंतु भुवीने कमबॅक करताना पाचव्या चेंडूवर त्याला बाद केले. ७व्या षटकात रोहितनं फिरकीपटू युझवेंद्र चहलला आणले आणि त्याने विकेट घेतली. कायल मेयर्स ४२ धावांवर LBW झाला. पदार्पणवीर रवी बिश्नोईने ११व्या षटकात सामन्याला कलाटणी दिली. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने रोस्टन चेसला ( ४) पायचीत केले आणि त्यानंतर पाचव्या चेंडूवर रोवमन पॉवेल ( २) ला बाद केले. त्याने ४ षटकांत १७ धावा देताना दोन विकेट्स घेऊन पदार्पण अविस्मरणीय बनवले.
निकोलस पूरन एक बाजून लावून खेळत होता आणि त्याने ३८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण,त्याला हर्षल पटेलने चतुराईने बाद केले. संथ गतीने चेंडू टाकून पटेलने पूरनला झेलबाद केले. पूरन ४३ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला. वेस्ट इंडिजने २० षटकांत ७ बाद १५७ धावा केल्या. किरॉन पोलार्ड २४ धावांवर नाबाद राहिला. प्रत्युत्तरात रोहित व इशान यांनी तुफान सुरूवात केली. ओडीन स्मिथच्या पहिल्याच षटकात रोहितने २२ धावा चोपल्या. त्यात दोन चौकार व दोन षटकार खेचले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७.३ षटकांत ६४ धावांची भागीदारी केली. रोस्टन चेसने ८व्या षटकात रोहितला बाद केले. रोहितने १९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४० धावा केल्या.