Join us  

Dinesh Karthik, IND vs WI 1st T20I Live Updates : भारताने पहिला सामना सहज जिंकला, पण फलंदाजांच्या अपयशी कामगिरीने वाढवली चिंता

India vs West Indies 1st T20I Live Updates : भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 11:43 PM

Open in App

India vs West Indies 1st T20I Live Updates : भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवला. रोहित शर्मा ( Rohit Sharma) व दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) यांच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर भारताने आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोख पार पाडली. आर अश्विन व रवी बिश्नोई या फिरकीपटूंनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत विंडीजचा डाव डळमळीत केला. अर्शदीप सिंगनेही दोन विकेट्स घेतल्या. कर्णधार म्हणून रोहित शर्माचा हा ५०वा विजय ठरला.

रोहित शर्माने ( Rohit Sharma) अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाचा पाया सेट केला होता, परंतु एकामागून  एक फलंदाज माघारी परतल्याने १५ षटकांत ५ बाद १२७ अशी अवस्था झाली होती.  दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) मैदानावर आला अन् फटकेबाजीला सुरुवात झाली. त्याच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने ६ बाद १९० धावांपर्यंत मजल मारली. सूर्यकुमार यादव ( २४), श्रेयस अय्यर ( ०), रिषभ पंत ( १४), हार्दिक पांड्या ( १) व रवींद्र जडेजा ( १६) यांनी निराश केले. रोहित ४४ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६४ धावांवर बाद झाला. कार्तिकने धमाकेदार खेळ केला. कार्तिकने १९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४१ धावा केल्या. अश्विन १३ धावांवर नाबाद राहिला आणि भारताने ६ बाद १९० धावा केल्या. 

७व्या किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावर येऊन ट्वेंटी-२०त भारतासाठी दिनेक कार्तिकने केलेल्या नाबाद ४१ धावा ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. रवींद्र जडेजाने २०२०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ४४ धावा केल्या होत्या. कार्तिकने महेंद्रसिंग धोनीचा ( ३८ धावा वि. इंग्लंड, २०१२) विक्रम मोडला. कार्तिक व आर अश्विन यांनी ७व्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली आणि ही भारताकडून दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी दिनेश कार्तिक व कृणाल पांड्या यांनी २०१९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध नाबाद ६३ धावा चोपल्या होत्या.    वेस्ट इंडिजची सुरुवात काही चांगली झाली नाही. कायले मेयर्सला ( १५) अर्शदीप सिंगने चतुराईने बाऊन्सर टाकून बाद केले. रवींद्र जडेजाने त्याच्या पहिल्याच षटकात जेसन होल्डरचा (०) त्रिफळा उडवला. शामार्ह ब्रुक्स व कर्णधार निकोलस पूरन यांनी काही सुरेख फटके मारले, परंतु भुवनेश्वर कुमारने ही जोडी तोडली. ब्रुक्सचा ( २०) त्रिफळा उडवून भुवीने मोठी विकेट मिळवून दिली. त्यानंतर आर अश्विनने दोन विकेट्स घेताना पूरन ( १८) व शिमरोन हेटमायर ( १४) यांना माघारी पाठवले. अश्विनने त्याच्या चार षटकांत २२ धावांत २ विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोईने विंडीजच्या फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवले. रोव्हमन पॉवेल ( १४) व ओडीन स्मिथ (०) माघारी परतल्याने विंडीजची अवस्था १३.२ षटकांत ७ बाद ८६ अशी झाली. विंडीजला ३० चेंडूंत ९३ धावा करायच्या होत्या. बिश्नोईने २६ धावांत २, तर अर्शदीपने २४ धावांत २ विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजला ८ बाद १२२ धावा करता आल्या. भारताने ६८ धावांनी सामना जिंकला.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मादिनेश कार्तिक
Open in App