IND vs WI, 1st T20I Live Updates : रवी बिश्नोईने पदार्पणातच सचिन तेंडुलकरचा १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; पण, निकोलस पूरनने विंडीजचा डाव सावरला

India vs West Indies, 1st T20I Live Updates : पदार्पणवीर रवी बिश्नोईने ( Ravi Bishnoi) भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात प्रभावी कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 08:59 PM2022-02-16T20:59:58+5:302022-02-16T21:00:27+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI, 1st T20I Live Updates : Ravi Bishnoi break Sachin Tendulkar record on his T20I debut, Fifty by Nicholas Pooran in 38 balls,  | IND vs WI, 1st T20I Live Updates : रवी बिश्नोईने पदार्पणातच सचिन तेंडुलकरचा १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; पण, निकोलस पूरनने विंडीजचा डाव सावरला

IND vs WI, 1st T20I Live Updates : रवी बिश्नोईने पदार्पणातच सचिन तेंडुलकरचा १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; पण, निकोलस पूरनने विंडीजचा डाव सावरला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies, 1st T20I Live Updates : पदार्पणवीर रवी बिश्नोईने ( Ravi Bishnoi) भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात प्रभावी कामगिरी केली. त्याला अन्य गोलंदाजांची आणखी चांगली साथ मिळाली असती तर टीम इंडियाला  या सामन्यात वेस्ट इंडिजच्या धावसंख्येवर अंकुश लावता आला असता. विंडिजचा  निकोलस पूरन ( Nicholas Pooran ) याने एक बाजूने खिंड लढवताना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील पाचव्या जलद अर्धशतकाची नोंद केली. पूरनच्या संघर्षामुळे विंडिजला यजमानांसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारता आल्या. रवी बिश्नोईने आज सचिन तेंडुलकरचा ( Sachin Tendulkar) १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर ब्रेंडन किंग्सने खणखणीत चौकार मारला, परंतु भुवीने कमबॅक करताना पाचव्या चेंडूवर त्याला बाद केले. त्यानंतर आलेल्या निकोलस पूरन याने सलामीवीर कायल मेयर्ससोबत संयमी खेळ केला. दीपक चहरने टाकलेल्या चौथ्या षटकात दोन्ही फलंदाजांचे झेल उडाले, परंतु भारतीय खेळाडूंना थोडक्यात ते झेल टिपता आले नाही. याच षटकात पूरनने वाईड मिड ऑनला लगावलेला षटकात पाहण्यासारखा होता. ७व्या षटकात रोहितनं फिरकीपटू युझवेंद्र चहलला आणले आणि त्याने विकेट घेतली. त्याआधी रवी बिश्नोईने निकोलस पूरनचा झेल टिपला होता, परंतु अंदाज चुकल्यानं तो सीमारेषेवर जाऊन टेकला. पण, याची भरपाई चहलने कायल मेयर्सला बाद करून घेतली. मेयर्स ४२ धावांवर LBW झाला.  

पदार्पणवीर रवी बिश्नोईने ११व्या षटकात सामन्याला कलाटणी दिली. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने रोस्टन चेसला ( ४) पायचीत केले आणि त्यानंतर पाचव्या चेंडूवर रोवमन पॉवेल ( २) उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात वेंकटेश अय्यरकरवी झेलबाद झाला. निकोलस पूरन एक बाजून लावून खेळत होता आणि त्याने ३८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण,त्याला हर्षल पटेलने चतुराईने बाद केले. संथ गतीने चेंडू टाकून पटेलने पूरनला झेलबाद केले. पूरन ४३ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला. वेस्ट इंडिजने २० षटकांत ७ बाद १५७ धावा केल्या. किरॉन पोलार्ड २४ धावांवर नाबाद राहिला. 


मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम... 
बिश्नोईने त्याच्या ४ षटकांत १७ धावा देताना दोन विकेट्स घेऊन पदार्पण अविस्मरणीय बनवले. या कामगिरीसह त्याने सचिन तेंडुलकरचा ( Sachin Tendulkar) विक्रम मोडला. भारताकडून ट्वेंटी-२० सामन्यात पदार्पणातील ही तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. Best Bowling figures by Indian spinner in T20I debut या विक्रमात प्रग्यान ओझा ( ४-२१) व अक्षर पटेल ( ३-१७) हे आघाडीवर आहेत. सचिनने ट्वेंटी-२० पदार्पणात १२ धावांत १ विकेट घेतली होती आणि तो विक्रम आज बिश्नोईने मोडला. सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २००६ मध्ये ही कामगिरी  केली होती.

Web Title: IND vs WI, 1st T20I Live Updates : Ravi Bishnoi break Sachin Tendulkar record on his T20I debut, Fifty by Nicholas Pooran in 38 balls, 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.