IND vs WI, 1st T20I Live Updates : रवी बिश्नोईचे पदार्पण; टीम इंडियाने नाणेफेक जिंकली, जाणून घ्या Playing XI मध्ये कोणाला संधी दिली... 

India vs West Indies, 1st T20I Live Updates : वन डे मालिकेत वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ आता ट्वेंटी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 06:34 PM2022-02-16T18:34:20+5:302022-02-16T18:47:26+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI, 1st T20I Live Updates : Ravi Bishnoi is making his T20I debut, India won the toss and decided to bowl first, know playing XI  | IND vs WI, 1st T20I Live Updates : रवी बिश्नोईचे पदार्पण; टीम इंडियाने नाणेफेक जिंकली, जाणून घ्या Playing XI मध्ये कोणाला संधी दिली... 

IND vs WI, 1st T20I Live Updates : रवी बिश्नोईचे पदार्पण; टीम इंडियाने नाणेफेक जिंकली, जाणून घ्या Playing XI मध्ये कोणाला संधी दिली... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies, 1st T20I Live Updates : वन डे मालिकेत वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ आता ट्वेंटी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डनवर तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे आणि त्याचा पहिला सामना आज होणार आहे. लोकेश राहुल, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ही मालिका सुरू होण्याआधीच माघार घेतली. कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) आज कोणाला संधी देतो याची उत्सुकता होती. आजच्या सामन्यात रवी बिश्नोईने ( Ravi Bishnoi ) पदार्पण केले. २०२०च्या १९ वर्षांखालील संघातून थेट टीम इंडियाच्या सीनियर संघात पदार्पण करणारा पहिलाच खेळाडू ठरला. युझवेंद्र चहलने त्याला पदार्पणाची कॅप दिली.


वेस्ट इंडिजच्या संघात कर्णधार किरॉन पोलार्डचे पुनरागमन झाले. वन डे मालिकेतील दोन सामन्यांत तो खेळला नव्हता. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ आजच्या सामन्यात पाच फलंदाज, एक अष्टपैलू आणि दोन फिरकीपटूंसह तीन जलदगती गोलंदाज असा संघ रोहितने मैदानावर उतरवला आहे.  

 भारतीय संघ - रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, वेंकटेश अय्यर, दीपक चहर, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल ( India XI - Rohit Sharma (c), Ishan Kishan,Virat Kohli, Suryakumar Yadav, Rishabh Pant (wk), Venkatesh Iyer, Deepak Chahar, Harshal Patel , Ravi Bishnoi, Bhuvneshwar Kumar, Yuzvendra Chahal) 

Web Title: IND vs WI, 1st T20I Live Updates : Ravi Bishnoi is making his T20I debut, India won the toss and decided to bowl first, know playing XI 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.