Join us  

Rohit Sharma, IND vs WI 1st T20I Live Updates : रोहित शर्मा एकटा लढला, दिनेश कार्तिकने 'फिनिशिंग टच' दिला; भारताने मजबूत टप्पा गाठला

India vs West Indies 1st T20I Live Updates : रोहित शर्मा ( Rohit Sharma) विक्रमी कामगिरी करताना पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 9:54 PM

Open in App

India vs West Indies 1st T20I Live Updates : रोहित शर्मा ( Rohit Sharma) विक्रमी कामगिरी करताना पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर माघारी परतल्यानंतर रोहितने रिषभ पंतसह फटकेबाजी करताना डाव सावरला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम रोहितच्या नावावर नोंदवला गेला आहे. रोहित बाद झाल्यानंतर भारताची गाडी पुन्हा घसरली, परंतु दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) धमाकेदार खेळ करून टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारून दिली. 

विंडीजच्या अकिल होसैनने अफलातून झेल घेतला, श्रेयस अय्यर भोपळ्यावर माघारी पाठवला, Video 

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्यकुमार व रोहित यांनी पहिल्या विकेटसाठी ४३ धावा जोडल्या. अकिल होसैनने २४ धावा करणाऱ्या सूर्यकुमारची विकेट मिळवली. ओबेड मॅकोयने भारताला दुसरा धक्का देताना श्रेयस अय्यरला ( ०) बाद केले. अकिल होसैनने स्लिपमध्ये अफलातून झेल घेतला.  ३३ वी धाव घेताच रोहित आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याने ३३९९ धावा करणाऱ्या  मार्टिन गुप्तीलला मागे टाकले. रोहितच्या नावावर आता ३४०६* धावा झाल्या आहेत. विराट कोहली ३३०८ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

आयपीएलमधील गुजरात टायटन्सच्या संघात खेळणाऱ्या अल्झारी जोसेफने भारताला धक्का देताना GT कर्णधार हार्दिक पांड्याला ( १) बाद केले. रोहित ४४ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६४ धावांवर जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आणि भारताचा निम्मा संघ १२७ धावांत तंबूत परतला. रवींद्र जडेजाही ( १६) फार काही करू शकला नाही. पण, दिनेश कार्तिकने पुन्हा एका फिनिशरची भूमिका चोख बजावली आणि भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. कार्तिकने १९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४१ धावा केल्या. अश्विन १३ धावांवर नाबाद राहिला आणि भारताने ६ बाद १९० धावा केल्या.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मादिनेश कार्तिक
Open in App