India vs West Indies 1st T20I Live Updates : सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर माघारी परतल्यानंतर रोहित शर्माने टीम इंडियाचा डाव सावरला आहे. Rohit Sharma ने रिषभ पंतसह फटकेबाजी करताना भारत-वेस्ट इंडिज पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात विश्वविक्रमाला गवसणी घातली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोनच दिवसांपूर्वी न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्तीलने हा विक्रम स्वतःच्या नावावर केला होता. तो आता रोहितच्या नावावर नोंदवला गेला आहे.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध मागिल १२ पैकी ११ सामन्यांत पराभव पत्करला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने मागिल १५ पैकी १४ सामने जिंकले आहेत. रोहितसह रिषभ पंत सलामीला येणार अशी चर्चा होती, परंतु प्रत्यक्षात सूर्यकुमार यादव सलामीला आला. २०२२मध्ये भारताने ट्वेंटी-२०त इशान किशन ( १३ डाव), रोहित शर्मा ( ९), ऋतुराज गायकवाड ( ६), संजू सॅमसन ( २), रिषभ पंत ( २), दीपक हुडा ( १) व सूर्यकुमार ( १) अशा सलामीवीरांचा प्रयोग केला.
सूर्यकुमार व रोहित यांनी दुसऱ्याच षटकात जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर १५ धावा कुटल्या. तिसऱ्या षटकात अकिल होसैनच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारला जीवदान मिळाले. पण, अकिल होसैन पुढच्या षटकात सूर्यकुमार यादवची विकेट मिळवली. सूर्यकुमार २४ धावांवर जेसन होल्डरच्या हाती सोपा झेल देऊन माघारी परतला. ओबेड मॅकोयने भारताला दुसरा धक्का देताना श्रेयस अय्यरला ( ०) बाद केले. अकिल होसैनने स्लिपमध्ये अफलातून झेल घेतला. ३९ डावांत श्रेयस तिसऱ्यांदा शून्यावर ( याआधी दोन वेळा गोल्डन डक) बाद झाला आहे. भारताने ७ षटकांत ५० धावांचा टप्पा ओलांडला.
३३ वी धाव घेताच रोहित आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याने ३३९९ धावा करणाऱ्या मार्टिन गुप्तीलला मागे टाकले. रोहितच्या नावावर आता ३४०६* धावा झाल्या आहेत. विराट कोहली ३३०८ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Web Title: IND vs WI 1st T20I Live Updates : Rohit Sharma is now the leading run scorer in T20i history
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.