India vs West Indies, 1st T20I Live Updates : पदार्पणवीर रवी बिश्नोईने ( Ravi Bishnoi) याच्या प्रभावी कामगिरीनंतर रोहित शर्मा व इशान किशन यांनी फलंदाजीच आतषबाजी केली. १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित व इशान ( Rohit Sharma - Ishan Kishan) २९ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रोहित त्याच्या फेव्हरिट ईडन गार्डनवर पुन्हा एकदा मनमुराद फटकेबाजी करताना दिसला आणि त्यानं या फटकेबाजीसह विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यांचा विक्रम मोडला. भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर ब्रेंडन किंग्सने खणखणीत चौकार मारला, परंतु भुवीने कमबॅक करताना पाचव्या चेंडूवर त्याला बाद केले. ७व्या षटकात रोहितनं फिरकीपटू युझवेंद्र चहलला आणले आणि त्याने विकेट घेतली. त्याआधी रवी बिश्नोईने निकोलस पूरनचा झेल टिपला होता, परंतु अंदाज चुकल्यानं तो सीमारेषेवर जाऊन टेकला. पण, याची भरपाई चहलने कायल मेयर्सला बाद करून घेतली. मेयर्स ४२ धावांवर LBW झाला. पदार्पणवीर रवी बिश्नोईने ११व्या षटकात सामन्याला कलाटणी दिली. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने रोस्टन चेसला ( ४) पायचीत केले आणि त्यानंतर पाचव्या चेंडूवर रोवमन पॉवेल ( २) उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात वेंकटेश अय्यरकरवी झेलबाद झाला. बिश्नोईने त्याच्या ४ षटकांत १७ धावा देताना दोन विकेट्स घेऊन पदार्पण अविस्मरणीय बनवले.
निकोलस पूरन एक बाजून लावून खेळत होता आणि त्याने ३८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण,त्याला हर्षल पटेलने चतुराईने बाद केले. संथ गतीने चेंडू टाकून पटेलने पूरनला झेलबाद केले. पूरन ४३ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला. वेस्ट इंडिजने २० षटकांत ७ बाद १५७ धावा केल्या. किरॉन पोलार्ड २४ धावांवर नाबाद राहिला. प्रत्युत्तरात रोहित व इशान यांनी तुफान सुरूवात केली. ओडीन स्मिथच्या पहिल्याच षटकात रोहितने २२ धावा चोपल्या. त्यात दोन चौकार व दोन षटकार खेचले. या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद ५८ धावा केल्या. रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध ट्वेंटी-२० सर्वाधिक ५४० धावा करणाऱ्या पाकिस्तानी कर्णधार बाबर आजमचा विक्रम मोडला. रोहितने ५४१+ धावा केल्या आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीट ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहितने सहकारी विराट कोहलीला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तील ३२९९ धावांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर रोहित शर्मा ३२३१*( अजून खेळतोय) आणि विराट ( ३२२७) यांचा क्रमांक येतो. Rohit Sharma surpasses Virat Kohli in most T20I runs scored