India vs West Indies 1st T20I Live Updates : वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध मागिल १२ पैकी ११ सामन्यांत पराभव पत्करला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने मागिल १५ पैकी १४ सामने जिंकले आहेत. वेस्ट इंडिजकडून आज अल्झारी जोसेफ पदार्पण करणार आहे. रोहित शर्माचे पुनरागमन होत असून रिषभ पंत व हार्दिक पांड्या हेही सीनियर खेळाडू विश्रांती नंतर परतले आहेत. रवींद्र जडेजा तंदुरुस्त झाला असून तोही आजच्या सामन्यात खेळणार आहे.
रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी १०८ धावांची गरज आहे. ६ चौकार मारताच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५०० चौकार पूर्ण करेल. याशिवाय आज जर त्याने २१ धावा केल्यास ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावांचा विक्रम त्याच्या नावावर होईल. रोहितने आज ६ षटकार मारल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांमध्ये शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी तो बरोबरी करेल.
रोहितसह रिषभ पंत सलामीला येणार अशी चर्चा होती, परंतु प्रत्यक्षात सूर्यकुमार यादव सलामीला आला. त्याच्यानंतर श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन व अर्षदीप सिंग अशी क्रमवारी असेल. हार्दिककडे उप कर्णधारपद सोपवले गेले आहे.
Web Title: IND vs WI 1st T20I Live Updates : Suryakumar Yadav and Rohit Sharma opening for India, Hardik Pandya is the vice captain of Indian team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.