Join us  

Shreyas Iyer, IND vs WI 1st T20I Live Updates : विंडीजच्या अकिल होसैनने अफलातून झेल घेतला, श्रेयस अय्यर भोपळ्यावर माघारी पाठवला, Video 

Rohit Sharma ने रिषभ पंतसह फटकेबाजी करताना भारत-वेस्ट इंडिज पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात विश्वविक्रमाला गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 9:24 PM

Open in App

India vs West Indies 1st T20I Live Updates : सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर माघारी परतल्यानंतर रोहित शर्माने टीम इंडियाचा डाव सावरला. Rohit Sharma ने रिषभ पंतसह फटकेबाजी करताना भारत-वेस्ट इंडिज पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात विश्वविक्रमाला गवसणी घातली. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम रोहितच्या नावावर नोंदवला गेला आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरची ( Shreyas Iyer) विकेट लक्ष वेधणारी ठरली. विंडीजच्या अकिल होसैनने अफलातून झेल घेत भारताला मोठा धक्का दिला. 

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध मागिल १२ पैकी ११ सामन्यांत पराभव पत्करला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने मागिल  १५ पैकी १४ सामने जिंकले आहेत. रोहितसह रिषभ पंत सलामीला येणार अशी चर्चा होती, परंतु प्रत्यक्षात सूर्यकुमार यादव सलामीला आला. २०२२मध्ये भारताने ट्वेंटी-२०त इशान किशन ( १३ डाव), रोहित शर्मा ( ९), ऋतुराज गायकवाड ( ६), संजू सॅमसन ( २), रिषभ पंत ( २), दीपक हुडा ( १) व सूर्यकुमार ( १) अशा सलामीवीरांचा प्रयोग केला. 

सूर्यकुमार व रोहित यांनी दुसऱ्याच षटकात जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर १५ धावा कुटल्या. तिसऱ्या षटकात अकिल होसैनच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारला जीवदान मिळाले. पण, अकिल होसैन पुढच्या षटकात सूर्यकुमार यादवची विकेट मिळवली. सूर्यकुमार २४ धावांवर जेसन होल्डरच्या हाती सोपा झेल देऊन माघारी परतला. ओबेड मॅकोयने भारताला दुसरा धक्का देताना श्रेयस अय्यरला ( ०) बाद केले. अकिल होसैनने स्लिपमध्ये अफलातून झेल घेतला. ३९ डावांत श्रेयस तिसऱ्यांदा शून्यावर ( याआधी दोन वेळा गोल्डन डक) बाद झाला आहे. भारताने ७ षटकांत ५० धावांचा टप्पा ओलांडला. ३३ वी धाव घेताच रोहित आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याने ३३९९ धावा करणाऱ्या  मार्टिन गुप्तीलला मागे टाकले. रोहितच्या नावावर आता ३४०६* धावा झाल्या आहेत. विराट कोहली ३३०८ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने अर्धशतक पूर्ण करून आणखी एक विक्रम नावावर केला. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील त्याचे हे ३१ वी ५०+ धावसंख्या ठरली. त्याने विराट कोहलीचा ( ३०) विक्रम मोडला. Rohit has now scored the most number of 50+ scores in T20I cricket. आयपीएलमधील गुजरात टायटन्सच्या संघात खेळणाऱ्या अल्झारी जोसेफने भारताला धक्का देताना GT कर्णधार हार्दिक पांड्याला ( १) बाद केले. रोहित ४४ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६४ धावांवर जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आणि भारताचा निम्मा संघ १२७ब धावांत तंबूत परतला. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजश्रेयस अय्यररोहित शर्मा
Open in App