Join us  

IND vs WI, 1st T20I Live Updates : Rohit Sharma ने कसला भारी कॅच घेतला, सूर्यकुमार यादव पाहतच राहिला, Video 

India vs West Indies, 1st T20I Live Updates : पदार्पणवीर रवी बिश्नोईने ( Ravi Bishnoi) भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात प्रभावी कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 9:14 PM

Open in App

India vs West Indies, 1st T20I Live Updates : पदार्पणवीर रवी बिश्नोईने ( Ravi Bishnoi) भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात प्रभावी कामगिरी केली.  विंडिजचा  निकोलस पूरन ( Nicholas Pooran ) याने एक बाजूने खिंड लढवताना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील पाचव्या जलद अर्धशतकाची नोंद केली. पूरनच्या संघर्षामुळे विंडिजला यजमानांसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारता आल्या. पण, या सामन्याच्या अखेरच्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) कसला भारी कॅच घेतला. त्याच कॅचसाठी आलेला सूर्यकुमार यादव पाहतच बसला. 

भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर ब्रेंडन किंग्सने खणखणीत चौकार मारला, परंतु भुवीने कमबॅक करताना पाचव्या चेंडूवर त्याला बाद केले. त्यानंतर आलेल्या निकोलस पूरन याने सलामीवीर कायल मेयर्ससोबत संयमी खेळ केला.  ७व्या षटकात रोहितनं फिरकीपटू युझवेंद्र चहलला आणले आणि त्याने विकेट घेतली. त्याआधी रवी बिश्नोईने निकोलस पूरनचा झेल टिपला होता, परंतु अंदाज चुकल्यानं तो सीमारेषेवर जाऊन टेकला. पण, याची भरपाई चहलने कायल मेयर्सला बाद करून घेतली. मेयर्स ४२ धावांवर LBW झाला.  

पदार्पणवीर रवी बिश्नोईने ११व्या षटकात सामन्याला कलाटणी दिली. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने रोस्टन चेसला ( ४) पायचीत केले आणि त्यानंतर पाचव्या चेंडूवर रोवमन पॉवेल ( २) उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात वेंकटेश अय्यरकरवी झेलबाद झाला. निकोलस पूरन एक बाजून लावून खेळत होता आणि त्याने ३८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण,त्याला हर्षल पटेलने चतुराईने बाद केले. संथ गतीने चेंडू टाकून पटेलने पूरनला झेलबाद केले. पूरन ४३ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला. वेस्ट इंडिजने २० षटकांत ७ बाद १५७ धावा केल्या. किरॉन पोलार्ड २४ धावांवर नाबाद राहिला. हर्षल पटेलने अखेरच्या चेंडूवर ओडिन स्मिथला बाद केले..    

पाहा भन्नाट कॅच...

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मासूर्यकुमार अशोक यादव
Open in App