Dinesh Karthik, IND vs WI 1st T20I Live Updates : अकडम, तिकडम! दिनेश कार्तिकचे फटके पाहून विंडीजचे खेळाडू चक्रावले; १९ चेंडूंत ४१ धावांची फटकेबाजी, Video

India vs West Indies 1st T20I Live Updates : रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाचा पाया सेट केला होता, परंतु एकामागून  एक फलंदाज माघारी परतल्याने १५ षटकांत ५ बाद १२७ अशी अवस्था झाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 10:38 PM2022-07-29T22:38:47+5:302022-07-29T22:39:13+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 1st T20I Live Updates : What a knock by Dinesh Karthik, India was struggling and he scored 41* from just 19 balls with 4 fours and 2 sixes, Video  | Dinesh Karthik, IND vs WI 1st T20I Live Updates : अकडम, तिकडम! दिनेश कार्तिकचे फटके पाहून विंडीजचे खेळाडू चक्रावले; १९ चेंडूंत ४१ धावांची फटकेबाजी, Video

Dinesh Karthik, IND vs WI 1st T20I Live Updates : अकडम, तिकडम! दिनेश कार्तिकचे फटके पाहून विंडीजचे खेळाडू चक्रावले; १९ चेंडूंत ४१ धावांची फटकेबाजी, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 1st T20I Live Updates : रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाचा पाया सेट केला होता, परंतु एकामागून  एक फलंदाज माघारी परतल्याने १५ षटकांत ५ बाद १२७ अशी अवस्था झाली होती. वेस्ट इंडिजसमोर आता सन्मानजनक धावांचे लक्ष्य ठेवले तरी पुरेसे वाटत होते. पण, दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) मैदानावर आला अन् फटकेबाजीला सुरुवात झाली. त्याच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने ६ बाद १९० धावांपर्यंत मजल मारली.

रोहित शर्मा ( Rohit Sharma) विक्रमी कामगिरी करताना पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सूर्यकुमार यादव ( २४)  व श्रेयस अय्यर ( ०) माघारी परतल्यानंतर रोहितने रिषभ पंतसह फटकेबाजी करताना डाव सावरला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम रोहितच्या नावावर नोंदवला गेला आहे. रोहित बाद झाल्यानंतर भारताची गाडी पुन्हा घसरली, परंतु दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) धमाकेदार खेळ करून टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारून दिली. रिषभ पंत ( १४), हार्दिक पांड्या ( १) व रवींद्र जडेजा ( १६) यांनी निराश केले. रोहित ४४ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६४ धावांवर बाद झाला. कार्तिकने १९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४१ धावा केल्या. अश्विन १३ धावांवर नाबाद राहिला आणि भारताने ६ बाद १९० धावा केल्या. 

७व्या किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावर येऊन ट्वेंटी-२०त भारतासाठी दिनेक कार्तिकने केलेल्या नाबाद ४१ धावा ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. रवींद्र जडेजाने २०२०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ४४ धावा केल्या होत्या. कार्तिकने महेंद्रसिंग धोनीचा ( ३८ धावा वि. इंग्लंड, २०१२) विक्रम मोडला. कार्तिक व आर अश्विन यांनी ७व्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली आणि ही भारताकडून दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी दिनेश कार्तिक व कृणाल पांड्या यांनी २०१९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध नाबाद ६३ धावा चोपल्या होत्या.   

Web Title: IND vs WI 1st T20I Live Updates : What a knock by Dinesh Karthik, India was struggling and he scored 41* from just 19 balls with 4 fours and 2 sixes, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.