"दो आवाज है, दो DRS भी है!, मै बोल रहा हू रिव्ह्यू ले!", Virat Kohliचे रोहित शर्माने ऐकले अन् पुढे जे घडले ते पाहा, Video 

India vs West Indiest, 1st T20I - भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजवर ६ विकेट्स राखून विजय मिळवताना १-० अशी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 02:08 PM2022-02-17T14:08:03+5:302022-02-17T14:08:39+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI, 1st T20I : Rohit Sharma signals for DRS review in comical way after Virat Kohli convinces him to do so, Watch  Video | "दो आवाज है, दो DRS भी है!, मै बोल रहा हू रिव्ह्यू ले!", Virat Kohliचे रोहित शर्माने ऐकले अन् पुढे जे घडले ते पाहा, Video 

"दो आवाज है, दो DRS भी है!, मै बोल रहा हू रिव्ह्यू ले!", Virat Kohliचे रोहित शर्माने ऐकले अन् पुढे जे घडले ते पाहा, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indiest, 1st T20I - भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजवर ६ विकेट्स राखून विजय मिळवताना १-० अशी आघाडी घेतली. पदार्पणवीर रवी बिश्नोई व हर्षल पटेल यांच्या दमदार गोलंदाजीनंतर रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि वेंकटेश अय्यर यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने १५८ धावांचे लक्ष्य सहज पार केले. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातल्या वादाबाबत बरंच काही लिहीलं गेलं. पण, या दोघांनी त्या अफवा चेंडू सीमापार सहजतेनं टोलवावा तशा भिरकावून दिल्या. रोहितच्या नेतृत्वाखाली विराट तसाच दिसतोय, जसा तो कर्णधार म्हणून होता. त्यामुळे रोहित-विराटचं चांगला बाँडिंग पाहायला मिळत आहे. याची प्रचिती पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यातही आली.

वेस्ट इंडिजच्या डावातील ८व्या षटकातील पाचव्या चेंडूवर पदार्पणवीर रवी बिश्नोईने रोस्टन चेससाठी कॅचची अपील केली. बिश्नोईने टाकलेला चेंडू लेगसाईटच्या दिशेने जात होता आणि तो यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हाताता विसावण्यापूर्वी आवाज आला. तेव्हा बिश्नोईने कॅचची अपील केली. पण, अम्पायर जयरमण मंदानागोपाल यांनी Wide सिग्नल दिला. तरीही बिश्नोई अपीलवर ठाम होता. तेव्हा विराटने रोहितला DRS घेण्यासाठी राजी केले आणि या दोघांचे संभाषक स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाले.

पाहा व्हिडीओ... 



रोहितने DRS घेतला, पण त्याआधीच लेग साईडच्या अम्पायरने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली होती. त्यामुळे भारताचा DRS तसाच राहिला. लेग साईट अम्पायरने स्टम्पिंगसाठी हा निर्णय घेतला होता, परंतु प्रत्यक्षात रिषभने स्टम्पिंगही केलं नव्हतं. DRS नंतर Wide चा निर्णय मात्र बदलला गेला.           

Web Title: IND vs WI, 1st T20I : Rohit Sharma signals for DRS review in comical way after Virat Kohli convinces him to do so, Watch  Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.