India vs West Indiest, 1st T20I - भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजवर ६ विकेट्स राखून विजय मिळवताना १-० अशी आघाडी घेतली. पदार्पणवीर रवी बिश्नोई व हर्षल पटेल यांच्या दमदार गोलंदाजीनंतर रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि वेंकटेश अय्यर यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने १५८ धावांचे लक्ष्य सहज पार केले. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातल्या वादाबाबत बरंच काही लिहीलं गेलं. पण, या दोघांनी त्या अफवा चेंडू सीमापार सहजतेनं टोलवावा तशा भिरकावून दिल्या. रोहितच्या नेतृत्वाखाली विराट तसाच दिसतोय, जसा तो कर्णधार म्हणून होता. त्यामुळे रोहित-विराटचं चांगला बाँडिंग पाहायला मिळत आहे. याची प्रचिती पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यातही आली.
वेस्ट इंडिजच्या डावातील ८व्या षटकातील पाचव्या चेंडूवर पदार्पणवीर रवी बिश्नोईने रोस्टन चेससाठी कॅचची अपील केली. बिश्नोईने टाकलेला चेंडू लेगसाईटच्या दिशेने जात होता आणि तो यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हाताता विसावण्यापूर्वी आवाज आला. तेव्हा बिश्नोईने कॅचची अपील केली. पण, अम्पायर जयरमण मंदानागोपाल यांनी Wide सिग्नल दिला. तरीही बिश्नोई अपीलवर ठाम होता. तेव्हा विराटने रोहितला DRS घेण्यासाठी राजी केले आणि या दोघांचे संभाषक स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाले.
पाहा व्हिडीओ...