IND vs WI 1st Test : WTC Final मधून वगळलेल्या आर अश्विनने दाखवला दम; ५ विकेट्स घेत वेस्ट इंडिजचा पहिला डाव गुंडाळला

India vs West Indies 1st Test Live : भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 01:00 AM2023-07-13T01:00:10+5:302023-07-13T01:00:36+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 1st Test Live updates Marathi : FIVE-WICKET HAUL FOR R ASHWIN,  West Indies 150/10 (64.3 overs) | IND vs WI 1st Test : WTC Final मधून वगळलेल्या आर अश्विनने दाखवला दम; ५ विकेट्स घेत वेस्ट इंडिजचा पहिला डाव गुंडाळला

IND vs WI 1st Test : WTC Final मधून वगळलेल्या आर अश्विनने दाखवला दम; ५ विकेट्स घेत वेस्ट इंडिजचा पहिला डाव गुंडाळला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 1st Test Live : भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवले आहे.. आर अश्विनने ( R Ashwin) ५ विकेट्स घेत विक्रमांची रांग लागवी. त्याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० विकेट्सचा टप्पा ओलांडला अन् भारताकडून सर्वात कमी इनिंग्जमध्ये पराक्रम करणारा गोलंदाज ठरला. रवींद्र जडेजानेही उत्तम गोलंदाजी केली आणि मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांनी त्यांना साथ मिळाली. पदार्पणवीर एलिक अथानाझे ( ४७) वगळल्यास वेस्ट इंडिजचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. 

४०००+ धावा अन् ७००+ विकेट्स! R Ashwin ने विक्रमांचे इमले रचले, यशस्वी-इशान-विराटनेही मैदान गाजवले


 कर्णधार क्रेग ब्रेथवेट ( २०) आणि तागेनारायण चंद्रपॉल ( १२ ) यांना आर अश्विनने माघारी पाठवले. विंडीजचे दोन्ही सलामीवीर ३८ धावांवर बाद झाले. शार्दूल ठाकूरने त्याच्या पहिल्याच षटकात रेयमंड रेइफर ( २) ची विकेट मिळवली, यष्टींमागे इशान किशनने चांगली कॅच घेतली. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर जेरमेन ब्लॅकवूड ( १४) याचा मोहम्मद सिराजने अफलातून झेल टिपला. भारताने पहिल्या सत्रात २८ षटकांत ६८ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.  लंच ब्रेकनंतर रवींद्र जडेजाने चांगला फिरकी चेंडू टाकला अन् जोशुआ डा सिल्वा ( २) कट मारण्याच्या प्रयत्नात इशानच्या हाती झेल देऊन बसला. विंडीजचा निम्मा संघ ७६ धावांत तंबूत परतला. 


या विकेटनंतर जेसन होल्डर व पदार्पणवीर एलिक अथानाझे यांनी चांगली भागीदारी केली. स्थानिक खेळाडू अथानाझे भारताच्या फिरकी गोलंदाजांचा चांगला सामना करताना दिसला अन् दुसऱ्या  बाजूने अनुभवी होल्डर चांगली साथ देत होता. पण, मोहम्मद सिराजने त्याला चूक करण्यास भाग पाडले अन् शार्दूलने सीमारेषेवर सोपा झेल टिपला. होल्डर ६१ चेंडूंत १८ धावा करून बाद झाला आणि अथानाझे सोबत त्याची ४१ ( १०८ चेंडू) धावांची भागीदारी संपुष्टात आली. आर अश्विनने विंडीजला सातवा धक्का देऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० विकेट्स पूर्ण केल्या. अनिल कुंबळे ( ९५६) आणि हरभजन सिंग ( ७११) यांच्यानंतर असा पराक्रम करणारा तो तिसरा भारतीय ठरला. 


अल्झारी जोसेफ ४ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर पुढच्या षटकात त्याने सेट झालेल्या अथानाझेला चूक करण्यास भाग पाडले. पुल मारण्याच्या प्रयत्नात अथानाझे झेलबाद झाला. त्याने ९९ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारांसह ४७ धावांवर बाद झाला. रोव्हमन कोर्नवॉलने धावा वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु विंडीजचा संघ १५० धावांत तंबूत परतला. आर अश्विनने 24.3-6-60-5 अशी स्पेल टाकली.

Web Title: IND vs WI 1st Test Live updates Marathi : FIVE-WICKET HAUL FOR R ASHWIN,  West Indies 150/10 (64.3 overs)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.