Join us  

इतिहास घडला! यशस्वी जैस्वाल-रोहित शर्मा जोडीने १७ वर्षांपूर्वीचा दोन दिग्गजांचा विक्रम मोडला

India vs West Indies 1st Test Live : यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा या जोडीने आज विक्रमांमागून विक्रम रचले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 10:45 PM

Open in App

India vs West Indies 1st Test Live : यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा या जोडीने आज विक्रमांमागून विक्रम रचले आहेत. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावाच्या १५० धावांच्या प्रत्युत्तरात या जोडीने दमदार सलामी दिली आहे. यशस्वी व रोहित दोघंही अर्धशतक पूर्ण करू खेळत आहेत आणि विक्रमांचे इमले रचत आहेत. या दोघांच्या या भागीदारीने १७ वर्षांपूर्वीचा वीरेंद्र सेहवाग व वसीम जाफर यांचा मोठा विक्रम मोडला. 

Record Break ! रोहित शर्माने अनोखे शतक झळकावून सुनील गावस्कर यांना मागे टाकले

विंडीजचा पहिला डाव १५० धावांत गडगडला. आर अश्विनने २४.३-६-६०-५ अशी स्पेल टाकली. रवींद्र जडेजाने ३ तर मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या. त्यानंतर यशस्वी व रोहित या जोडीने विंडीजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांच्या अर्धशतकांनी अनेक विक्रम मोडले. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित शर्मा ( १०२*) दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सचिन तेंडुलकर ( १२०) आघाडीवर आहे, तर सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग ( १०१) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. १७ वर्षानंतर वेस्ट इंडिजमध्ये प्रथमच भारतीय सलामीवीरांनी शतकी भागीदारी केली.  (IND vs WI 1st Test Live Scoreboard ) 

लंच ब्रेकनंतर दोघांची खेळाची गती वाढवली अन् दीडशतकी भागीदारी पूर्ण केली. ऑक्टोबर २०१९नंतर प्रथमच भारताच्या सलामीवीरांनी १५०+ भागीदारी केली. प्रतिस्पर्धी संघाच्या पहिल्या डावातील धावसंख्येचा भारताने एकही विकेट न गमावता केलेली ही पहिलीच वेळ ठरली. यशस्वी-रोहितने १६०वी धाव घेताच मोठा विक्रम नोंदवला गेला. वेस्ट इंडिजमध्ये १७ वर्षानंतर भारताकडून झालेली ही सलामीवीरांची सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २००६मध्ये वीरेंद्र सेहवाग व वसीम जाफर यांनी सेंट ल्युसिया येथे १५९ धावांची सलामी दिली होती. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मायशस्वी जैस्वालविरेंद्र सेहवागवासिम जाफर
Open in App