Join us  

रोहित शर्माचेही शतक; यशस्वीसोबत मोडला ४४ वर्षांपूर्वीचा गावस्कर/चौहान यांचा विक्रम

India vs West Indies 1st Test Live : यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी वैयक्तिक शतकं झळकावताना वेस्ट इंडिजचे कंबरडे मोडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 11:52 PM

Open in App

India vs West Indies 1st Test Live : यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी वैयक्तिक शतकं झळकावताना वेस्ट इंडिजचे कंबरडे मोडले. भारताने यजमानांचा पहिला डाव १५० धावांवर गुंडाळला अन् प्रत्युत्तरात यशस्वी व रोहित यांनी द्विशतकी भागीदारी करून विक्रम रचला. वेस्ट इंडिजविरुद्धची ही भारतीय सलामीवीरांची सर्वोत्तम भागीदारी ठरली. रोहितने २२० चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह शतक पूर्ण केलं.

 'यशस्वी' भव! २१ वर्षीय जैस्वालचे पदार्पणात शतक, मोडला ४९ वर्षांपूर्वीचा तगडा विक्रम

 यशस्वी व रोहित या जोडीने विंडीजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. १७ वर्षानंतर वेस्ट इंडिजमध्ये प्रथमच भारतीय सलामीवीरांनी विंडीजमध्ये शतकी भागीदारी केली. लंच ब्रेकनंतर दोघांची खेळाची गती वाढवली अन् दीडशतकी भागीदारी पूर्ण केली. विंडीजच्या गोलंदाजांनी टाकलेल्या काही सुरेख चेंडूंवर दोघांचे झेल उडाले खरे, परंतु तेथे खेळाडूच उपलब्ध नव्हते.  आत्मविश्वास उंचावलेल्या यशस्वीची फटकेबाजी पाहण्यासारखी होती. यशस्वीने आज ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. परदेशात किंवा तटस्थ ठिकाणी भारतीय सलामीवीराने पदार्पणात सर्वोत्तम खेळीचा विक्रम यशस्वीने नावावर केला. त्याने सुधिर नाईक यांचा ७७ ( वि. इंग्लंड, १९७४) विक्रम मोडला. यशस्वीने पदार्पणात शतक झळकावले आणि शिखर धवन व पृथ्वी शॉ यांच्यानंतर कसोटीत शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय ठरला. 

यशस्वीपाठोपाठ रोहितनेही कसोटीतील १०वे शतक झळकावले. रोहित-यशस्वीची २२४ धावांची भागीदारी ही भारतीय सलामीवीरांनी आशिया खंडाबाहेरील केलेली सर्वोत्तम ठरली. १९७९ मध्ये चेतन चौहान व सुनील गावस्कर यांनी इंग्लंडविरुद्ध २१३ धावा, तर १९३६ मध्ये विजय मर्चंट व मुश्ताक अली यांनी इंग्लंडविरुद्ध २०३ धावा जोडल्या होत्या. रोहित २२१ चेंडूंत १०३ धावांवर झेलबाद झाला अन् २२९ धावांवर भारताला पहिला धक्का बसला.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मायशस्वी जैस्वाल
Open in App