भारताची WTC मध्ये विजयी सलामी; १२ विकेट्स घेत आर अश्विनची ऐतिहासिक कामगिरी

IND vs WI 1st Test Live updates Marathi : पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने सहज विजय मिळवला. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 02:46 AM2023-07-15T02:46:42+5:302023-07-15T02:47:13+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 1st Test Live updates Marathi : India beat West Indies by innings and 141 runs, R Ashwin with 12 wickets, he becomes the 2nd highest wicket taker for India in International cricket | भारताची WTC मध्ये विजयी सलामी; १२ विकेट्स घेत आर अश्विनची ऐतिहासिक कामगिरी

भारताची WTC मध्ये विजयी सलामी; १२ विकेट्स घेत आर अश्विनची ऐतिहासिक कामगिरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs WI 1st Test Live updates Marathi : पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने सहज विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात ४२१ धावा करून भारताने २७१ धावांची आघाडी घेतली. यजमान दुसऱ्या डावात चांगला खेळ करतील अशी अपेक्षा होती, परंतु फिरकीला पोषक खेळपट्टीवर आर अश्विन व रवींद्र जडेजाने त्यांना नाचवले. या दोघांनी मिळून तिसऱ्या दिवशी ९ विकेट्स घेतल्या.  पहिल्या डावात ५ विकेट्स घेणाऱ्या अश्विनने आज ७ विकेट्स घेतल्या. आठव्यांदा अश्विनने कसोटीत १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आला. 


वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील १५० धावांच्या प्रत्युत्तरात भारताने पहिला डाव ५ बाद ४२१ धावांवर जाहीर केला. पदार्पणवारी यशस्वी जैस्वालच्या १७६ धावा, कर्णधार रोहित शर्माच्या १०३ आणि विराट कोहलीच्या ७६ धावांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात २७१ धावांची आघाडी घेतली. यशस्वी आणि रोहित यांनी २२९ धावांची सलामी देताना भारताचा पाया मजबूत केला. त्यानंतर यशस्वी व विराटने शतकी भागीदारी करून धावांचे इमले रचले. यशस्वी ३८७ चेंडूंत १६ चौकार व १ षटकारांसह १७१ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर विराट कोहलीने मिळालेल्या जीवदानांचा फायदा उचलत ७६ धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणे, शुबमन गिल अपयशी ठरले. पदार्पणवीर इशान किशन आणि रवींद्र जडेजा हे धावसंख्या वाढवतील असे वाटत असताना रोहितने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. इशानच्या १ धावेसाठी तो थांबला होता. रवींद्र ३७ धावांवर नाबाद राहिला.


प्रचंड वळणाऱ्या खेळपट्टीवर आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना नाचवले. जडेजाने भारताला पहिले यश मिळवून देताना तेजनारायण चंद्रपॉलला ( १२) पायचीत केले. त्यानंतर अश्विनने दुसरा सलामीवीर व कर्णधार क्रेग ब्रेथवेट ( २०) याची विकेट घेतली. जडेजा व अश्विन हे आलटून पालटून विंडीजला धक्के देत होते आणि त्यात मोहम्मद सिराजही आला. विंडीजचा निम्मा संघ  ५८ धावांवर माघारी परतला. जेसन होल्डर अन् लोकल बॉय एलिक अथानाझे यांनी विंडीजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पहिल्या डावात ४७ धावा करणाऱ्या अथानाझेने दुसऱ्या डावातही चांगले फटके मारले, परंतु २८ धावांवर अश्विनने त्याला माघारी पाठवले. त्यापाठोपाठ अल्झारी जोसेफलाही ( १३) बाद केले आणि अश्विनची ही चौथी विकेट ठरली. अश्विनने आणखी दोन विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने १० विकेट्स घेण्याची ही आठवी वेळ ठरली. 


इशांत शर्मानंतर ( १०-१०८) वेस्ट इंडिजमध्ये कसोटीत दहा विकेट्स घेणारा अश्विन पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत अश्विनने दुसरे स्थान पटकावले आहे. अनिल कुंबळे ९५३ विकेट्स सह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर अश्विन ( ७०८) आणि हरभजन सिंग ( ७०७) यांचा क्रमांक येतो. अश्विनने २१.३-७-७१-७ अशी स्पेल टाकून विंडीजचा दुसरा डाव १३० धावांवर गुंडाळला. भारताने हा सामना १ डाव व १४१ धावांनी जिंकला. 

Web Title: IND vs WI 1st Test Live updates Marathi : India beat West Indies by innings and 141 runs, R Ashwin with 12 wickets, he becomes the 2nd highest wicket taker for India in International cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.