Join us  

IND vs WI 1st Test : इशान किशनच्या १ रन साठी रोहित शर्मा थांबला, त्यानंतर बघा काय प्रकार घडला

IND vs WI 1st Test Live updates Marathi : रोहित शर्मासोबत मैदान गाजवणाऱ्या यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal)ला अनुभवी विराट कोहलीची शतकी साथ मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 11:13 PM

Open in App

IND vs WI 1st Test Live updates Marathi : रोहित शर्मासोबत मैदान गाजवणाऱ्या यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal)ला अनुभवी विराट कोहलीची शतकी साथ मिळाली. यशस्वी ३८७ चेंडूंत १६ चौकार व १ षटकारांसह १७१ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर विराट कोहलीने मिळालेल्या जीवदानांचा फायदा उचलत ७६ धावांची खेळी केली. पदार्पणवीर इशान किशन आणि रवींद्र जडेजा हे धावसंख्या वाढवतील असे वाटत असताना रोहितने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला.  

 BCCI ची मोठी घोषणा! ऋतुराज गायकवाड भारताचा कर्णधार; यशस्वी, रिंकू सिंग यांची ट्वेंटी-२०त एन्ट्री

वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील १५० धावांच्या प्रत्युत्तरात रोहित ( १०३) - यशस्वी  जोडीने २२९ धावांची भागीदारी केली. शुबमन गिल ६ धावांवर बाद झाला. विराट व यशस्वी या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून विंडीजचे टेंशन वाढवले. यशस्वी ३८७ चेंडूंचा सामना करून १७१ धावांवर झेलबाद झाला. अल्झारी जोसेफने ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. अजिंक्य ३ धावांवर केमार रोचच्या बाऊन्सरवर झेलबाद झाला. विराटने कसोटी कारकीर्दितले आज तिसरे संथ अर्धशतक पूर्ण केले. आशियाई खंडाबाहेरील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही त्याची ८८वी ५०+ धावांची खेळी ठरली अन् त्याने राहुल द्रविड ( ८७) याला मागे टाकले. सचिन तेंडुलकर ( ९६) अव्वल स्थानावर आहे.    (IND vs WI 1st Test Live Scoreboard ) 

विराटला आज दोन जीवदान मिळाले, ७२ धावांवर यष्टिरक्षकाने सोपा झेल टाकला अन् विंडिजचे खेळाडू संतापले. पण, ४ धावानंतर विराट माघारी परतला. रोव्हमन कॉर्नवॉलने त्याला लेग स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. विराट १८२ चेंडूंत ५ चौकरांसह ७६ धावा केल्या आणि भारताचा निम्मा संघ ४०५ धावांत तंबूत परतला. रवींद्र जडेजाने ८२ चेंडूंत नाबाद ३२ धावा केल्या. विराटच्या विकेटनंतर पदार्पणवीर इशान मैदानावर आला. त्याने २० चेंडू खेळून १ धाव केली. त्याची एक धाव होण्याची रोहित वाट पाहत होता. इशानने पहिली धाव घेताच रोहितने ५ बाद ४२१ धावांवर डाव घोषित केला. भारताने पहिल्या डावात २७१ धावांची आघाडी घेतली. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माइशान किशनयशस्वी जैस्वाल
Open in App