Join us  

चेस्ट इन्फेक्शनमुळे गोलंदाजाने मैदान सोडले; विंडीजने ९ जणांना कामाला लावले, १९७४ नंतर असे घडले 

IND vs WI 1st Test Live updates Marathi :  यजमान वेस्ट इंडिजकडून जिंकण्यासाठी फार प्रयत्न होताना दिसले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 2:08 AM

Open in App

IND vs WI 1st Test Live updates Marathi :  यजमान वेस्ट इंडिजकडून जिंकण्यासाठी फार प्रयत्न होताना दिसले नाही. यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांच्या शतकांनंतर विंडीजने हार मानली अन् त्यांच्याकडून फारच खराब खेळ होताना दिसला. त्याचा फायदा भारतीय फलंदाजांना मिळाला आणि त्यांच्या पहिल्या डावातील १५० धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ३०० पार धावा चोपल्या. या सामन्यात आणखी एक संकट विंडीजवर कोसळले अन् ते म्हणजे प्रमुख फिरकी गोलंदाज रोव्हमन कोर्नवॉल याला चेस्ट इन्फेक्शनमुळे मैदानाबाहेर जावे लागले आणि तो नंतर आलाच नाही. त्याच्या प्रकृतीबाबात अद्याप कोणतेच अपडेट्स आलेले नाहीत.

आर अश्विनच्या फिरकीसमोर विंडीजचा पहिला डाव १५० धावांवर गडगडला. त्याला प्रत्युत्ततर देताना यशस्वी व रोहित यांनी २२९ धावांची विक्रमी भागीदारी केली. रोहित १०३ धावांवर बाद झाल्यानंतर शुबमन गिलही लगेच माघारी परतला. यशस्वी एका बाजूने खिंड लढवताना दिसला अन् त्याला विराट कोहलीची उत्तम साथ मिळाली. १३३ धावांवर यशस्वी LBW झाला असता, परंतु विंडीजने ३ DRS गमावल्यामुळे मैदानावरील अम्पायरच्या निर्णयाला आव्हान देता आले नाही. कॉर्नवॉलची अनुपस्थिती विंडीजला महागात पडली अन् त्यांना ९ खेळाडूंकडून गोलंदाजी करून घ्यावी लागली. तागेनारायण चंद्रपॉल व यष्टिरक्षक सोडल्यास विंडीजच्या सर्व खेळाडूंनी गोलंदाजी केली.

वेस्ट इंडिजने चौथ्यांदा कसोटीच्या एका डावात ९ गोलंदाजांचा वापर केला.  यापूर्वी १९४८ मध्ये कोलकाता कसोटीत भारताविरुद्ध, १९७१ ब्रिजटाऊन कसोटीत भारताविरुद्ध आणि १९७४ किंगस्टन कसोटीत इंग्लंडविरुद्ध ही वेळ त्यांच्यावर आली होती. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजयशस्वी जैस्वाल
Open in App