Record Break ! रोहित शर्माने अनोखे शतक झळकावून सुनील गावस्कर यांना मागे टाकले

India vs West Indies 1st Test Live : यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा या जोडीने आज विक्रमांमागून विक्रम रचले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 09:32 PM2023-07-13T21:32:58+5:302023-07-13T21:34:25+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 1st Test Live updates Marathi : Rohit Sharma has the 2nd most fifty plus score as an opener in Indian cricket history.  | Record Break ! रोहित शर्माने अनोखे शतक झळकावून सुनील गावस्कर यांना मागे टाकले

Record Break ! रोहित शर्माने अनोखे शतक झळकावून सुनील गावस्कर यांना मागे टाकले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 1st Test Live : यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा या जोडीने आज विक्रमांमागून विक्रम रचले आहेत. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावाच्या १५० धावांच्या प्रत्युत्तरात या जोडीने १४२ धावांची सलामी दिली आहे. यशस्वी व रोहित दोघंही अर्धशतक पूर्ण करू खेळत आहेत आणि विक्रमांचे इमले रचत आहेत. यशस्वीने विक्रम केले असताना रोहितनेही महान फलंदाज सुनील गावस्कर यांना मागे टाकले आहे. त्याने सौरव गांगुलीशीही बरोबरी केलीय. भारताने दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत बिनबाद १४६ धावा केल्या आहेत. 

सुनील गावस्करांनंतर यशस्वी जैस्वालने पराक्रम केला; १९७१ नंतर विक्रम होताच सहकाऱ्यांचा जल्लोष पाहा


विंडीजचा पहिला डाव १५० धावांत गडगडला. आर अश्विनने २४.३-६-६०-५ अशी स्पेल टाकली. रवींद्र जडेजाने ३ तर मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या.  यशस्वीने १०४ चेंडूंत ७ चौकारांच्या सहाय्याने ही खेळी केली अन् रोहितसह शतकी भागीदारीही पूर्ण केली. यशस्वीने अर्धशतक करताच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, विराट कोहली, केएस भरत आणि इशान किशन यांनी उभं राहून टाळ्यांचा कडकड़ाट केला.  ( पाहा व्हिडीओ )  वेस्ट इंडिजमध्ये कसोटीत शतकी भागीदारी करणाऱ्या ४ सलामीच्या जोड्या आहेत आणि त्याता रोहित-यशस्वीचा समावेश झालाय. १९७१ मध्ये गावस्कर/अशोक मंकड, १९७६ मध्ये गावस्कर/अंषुमन गायकवाड, २००६ मध्ये सेहवाग/जाफर ( दोन वेळा) यांनी असा पराक्रम केला होता.  (IND vs WI 1st Test Live Scoreboard ) 

Image

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित शर्मा ( १०२*) दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सचिन तेंडुलकर ( १२०) आघाडीवर आहे, तर सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग ( १०१) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये ३५०० धावांचा टप्पाही पार केला. भारताबाहेर रोहितने ५९ वेळा ५०+ धावा करून  सौरव गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. सचिन तेंडुलकर ( ९६), विराट कोहली ( ८७) आणि राहुल द्रविड ( ८७) हे आघाडीवर आहेत. 

Web Title: IND vs WI 1st Test Live updates Marathi : Rohit Sharma has the 2nd most fifty plus score as an opener in Indian cricket history. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.