यशस्वी जैस्वालचा 'युनिक' विक्रम! मोहम्मद अझरुद्दीनचा १९८४ सालचा मोडला पराक्रम

IND vs WI 1st Test Live updates Marathi : यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) पदार्पणाची कसोटी अनेक विक्रमांची आतषबाजी करून गाजवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 02:22 AM2023-07-14T02:22:23+5:302023-07-14T02:23:05+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 1st Test Live updates Marathi : Unique record for Yashasvi Jaiswal. He has faced the highest balls for any Indian player on debut. | यशस्वी जैस्वालचा 'युनिक' विक्रम! मोहम्मद अझरुद्दीनचा १९८४ सालचा मोडला पराक्रम

यशस्वी जैस्वालचा 'युनिक' विक्रम! मोहम्मद अझरुद्दीनचा १९८४ सालचा मोडला पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs WI 1st Test Live updates Marathi : यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) पदार्पणाची कसोटी अनेक विक्रमांची आतषबाजी करून गाजवली. कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला येताना त्याने २२९ धावांची भागीदारी केली आणि वेस्ट इंडिजमधील ही भारतीय ओपनर्सची सर्वोत्तम भागीदारी ठरली. विंडीजमध्ये प्रथमच भारतीय सलामीवीरांनी २००+ धावा जोडल्या. रोहित १०३ धावांवर माघारी परतल्यानंतर यशस्वीने अनुभवी विराट कोहलीसह अर्धशतकी भागीदारी करून भारताला तीनशेपार पोहोचवले. 

दबक्या पावलांनी आला अन्...! यशस्वी जैस्वालने रोहितसह मोडले ९ मोठे विक्रम, १९३६नंतर घडला पराक्रम

यशस्वीने आजच्या त्याच्या खेळीत सुनील गावस्कर, सुधीर नाईक, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली आदी अनेक दिग्गजांचे विक्रम मोडले. कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा यशस्वी चौथा  युवा ( २१ वर्ष व १९६ दिवस) भारतीय फलंदाज ठरला. या विक्रमात पृथ्वी शॉ ( १८ वर्ष व ३२९ दिवस), अब्बास अली ( २० वर्ष ल १२६ दिवस) व गुंडप्पा विश्वनाथ ( २० वर्ष व २७६ दिवस) हे आघाडीवर आहेत. पण, भारताबाहेर शतक झळकावणारा तिसरा युवा फलंदाज ठरला. माधव आपटे ( २० वर्ष व १३७ दिवस वि. वेस्ट इंडिज, १९५३) आणि रवी शास्त्री ( २० वर्ष व २४८ दिवस वि. पाकिस्तान, १९८३) हे आघाडीवर आहेत.  


पण, यशस्वीने आणखी एक विक्रम आज नोंदवला. त्याने कसोटी पदार्पणात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम नावावर केला. यशस्वीने ३३६* चेंडूंचा सामना करताना मोहम्मद अझरुद्दीनचा ( वि. इंग्लंड, कोलकाता १९८४) ३२२ चेंडूंचा विक्रम मोडला. या विक्रमात सौरव गांगुली ( ३०१ चेंडू वि. इंग्लंड, १९९६) आणि रोहित शर्मा ( ३०१ चेंडू वि. वेस्ट इंडिज, २०१३) हे मागे आहेत. 


 

Web Title: IND vs WI 1st Test Live updates Marathi : Unique record for Yashasvi Jaiswal. He has faced the highest balls for any Indian player on debut.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.