India vs West Indies 1st Test Live : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवानंतर एक महिन्याची विश्रांती भारतीय संघाला मिळाली आणि आता ताजेतवान होत रोहित शर्मा अँड टीम आज मैदानावर उतरणार आहे. WTC 2023-25च्या हंगामातील टीम इंडियाची पहिली कसोटी आज वेस्ट इंडिजविरुद्ध होत आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंची सांगड घालून भारतीय संघ आज मैदानावर उतरण्यासाठी सज्ज आहे. भविष्याचा विचार करून संघात काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळत आहेत आणि हा प्रयोग यशस्वी झाल्यास भारताची फ्युचर टीम हिच असेल. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
चेतेश्वर पुजाराच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर कोणाला खेळवले जाईल, हा या कसोटीपूर्वी सर्वांनाच पडलेला प्रश्न होता. पण, रोहितने त्याचे उत्तर कालच दिले. देशांतर्गत स्पर्धा आणि आयपीएल गाजवणारा यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) सलामीला उतरणार असून शुबमन गिल त्याच्या नैसर्गिक तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. २ फिरकीपटू व ३ जलदगती गोलंदाज असे समीकरण असेल, हेही रोहितने स्पष्ट केले होते. पण, ते कोण असतील हे आज स्पष्ट झाले. आजच्या सामन्याची खेळपट्टी पाहता ती फलंदाजांसाठी पोषक दिसतेय आणि भारताच्या युवा ब्रिगेडकडून दमदार खेळीची चाहत्यांना अपेक्षा आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत ९८ कसोटी सामने झाले आणि त्यापैकी २२ भारताने, तर ३० वेस्ट इंडिजने जिंकले आहेत. ४६ लढती अनिर्णित राहिल्या. पण, मागील २१ वर्षांत वेस्ट इंडिजला भारताविरुद्ध एकही कसोटी जिंकता आलेली नाही. विंडसोर पार्कवर विंडीजने ५ कसोटी सामने खेळले, परंतु त्यापैकी एकच त्यांना जिंकता आलेली आहे. आजच्या सामन्यात यशस्वी जैस्वाल व इशान किशन यांना पदार्पणाची संधी दिली गेली आहे. यष्टीरक्षक केएस भरत आणि इशान यांच्यातही स्पर्धा होती.
भारताची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट
Web Title: IND vs WI 1st Test Live updates Marathi : Yashasvi Jaiswal and Ishan Kishan make their Test debut, West Indies have won the toss, check Indian Playin XI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.