Join us  

IND vs WI 1st Test : पठ्ठा बराच 'फास्ट' निघाला! यशस्वी जैस्वालने पदार्पणात सचिन तेंडुलकरला टाकले मागे

India vs West Indies 1st Test Live : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने दोन मोठे निर्णय घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 9:23 PM

Open in App

India vs West Indies 1st Test Live : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने दोन मोठे निर्णय घेतले. सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वालची निवड केली आणि यष्टिरक्षक फलंदाज म्हणून इशान किशनला संधी दिली. या सामन्यात दोन भारतीय खेळाडूंनी पदार्पण केले.  यशस्वीने पदार्पणाच्या सामन्यात सचिन तेंडुलकरला मागे टाकले.  

WTC Final मध्ये दिली नाही संधी, आज आर अश्विनची ऐतिहासिक गोलंदाजी; ठरला पहिला भारतीय

मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या यशस्वीने आयपीएल २०२३ च्या मोसमात स्फोटक फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. राजस्थान रॉयल्सकडून यशस्वीने १४ सामन्यांत ६२५ धावा केल्या. त्यानंतर त्याची कसोटी संघात निवड झाली. यशस्वीचा प्रथम श्रेणीतील विक्रमही अतिशय प्रभावी आहे. त्याने १५  सामन्यांमध्ये ८०.२१च्या सरासरीने ९ शतकांसह १८४५ धावा केल्या आहेत.   

तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये ८०.२१ च्या मजबूत सरासरीसह टीम इंडियासाठी पदार्पण करणारा तिसरा फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. जेव्हा सचिनने भारतासाठी कसोटी पदार्पण केले होते, त्यावेळी त्याची स्थानिक क्रिकेटमध्ये सरासरी ७०.१८ होती. स्थानिक क्रिकेटमध्ये ८८.३७ च्या सरासरीने धावा केल्यानंतर विनोद कांबळी टीम इंडियाकडून खेळणारा पहिला फलंदाज आहे.  (IND vs WI 1st Test Live Scoreboard ) 

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोच्च सरासरीने कसोटी पदार्पण करणारे भारतीय फलंदाज :-  

  • ८८.३७ ची सरासरी - विनोद कांबळी ( २७ सामने)
  • ८१.२३ची सरासरी - प्रवीण अमरे ( २३ सामने)
  • ८०.२१ची सरासरी - यशस्वी जैस्वाल (१५ सामने)
  • ७१.२८ची सरासरी - रुसी मोदी ( ३८ सामने)
  • ७०.१८ ची सरासरी - सचिन तेंडुलकर  
  • ६८.७८ ची सरासरी - शुभमन गिल (२३ सामने)
टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजयशस्वी जैस्वालसचिन तेंडुलकर
Open in App