Join us  

IND vs WI 1st Test : यशस्वी, इशानचे नाव गाजले! भारताच्या ७७ वर्षांच्या कसोटी इतिहासात पाचव्यांदाच असे घडले

India vs West Indies 1st Test Live :  WTC 2023-25च्या हंगामातील टीम इंडियाची पहिली कसोटी आज वेस्ट इंडिजविरुद्ध होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 7:44 PM

Open in App

India vs West Indies 1st Test Live :  WTC 2023-25च्या हंगामातील टीम इंडियाची पहिली कसोटी आज वेस्ट इंडिजविरुद्ध होत आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंची सांगड घालून भारतीय संघ आज मैदानावर उतरण्यासाठी सज्ज आहे. भविष्याचा विचार करून संघात काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळत आहेत. यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन या डावखुऱ्या फलंदाजांनी आज कसोटी संघातून पदार्पण केलं आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

यशस्वी, इशान यांचे पदार्पण; नाणेफेकीचा कौल विंडीजच्या बाजूने, बघा भारताची प्लेइंग इलेव्हन

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत ९८ कसोटी सामने झाले आणि त्यापैकी २२ भारताने, तर ३० वेस्ट इंडिजने जिंकले आहेत. ४६ लढती अनिर्णित राहिल्या. पण, मागील २१ वर्षांत वेस्ट इंडिजला भारताविरुद्ध एकही कसोटी जिंकता आलेली नाही. विंडसोर पार्कवर विंडीजने ५ कसोटी सामने खेळले, परंतु त्यापैकी एकच त्यांना जिंकता आलेली आहे. आजच्या सामन्यात यशस्वी जैस्वालइशान किशन यांना पदार्पणाची संधी दिली गेली आहे. यष्टीरक्षक केएस भरत आणि इशान यांच्यातही स्पर्धा होती. 

वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करणारा इशान हा तिसरा भारतीय यष्टिरक्षक ठरला. यापूर्वी १९७१ मध्ये पोचिह कृष्णमुर्थी ( किंगस्टन) आणि २००२ मध्ये अजय रात्रा ( पोर्ट ऑफ स्पेन) यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. भारताकडून कसोटीत एकाच सामन्यात डावखुरे खेळाडू पदार्पण करण्याची ही पाचवी वेळ आहे. यापूर्वी २०२१ मध्ये टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले होते. ( IND vs WI 1st Test Live Scoreboard

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजयशस्वी जैस्वालइशान किशन
Open in App