Join us  

सुनील गावस्करांनंतर यशस्वी जैस्वालने पराक्रम केला; १९७१ नंतर विक्रम होताच सहकाऱ्यांचा जल्लोष पाहा

India vs West Indies 1st Test Live : आर अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या फिरकी माऱ्यानंतर युवा खेळाडू यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्माने विंडीजला बॅकफूटवर फेकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 9:00 PM

Open in App

India vs West Indies 1st Test Live : भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवलेले पाहायला मिळतेय. आर अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या फिरकी माऱ्यानंतर युवा खेळाडू यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्माने विंडीजला बॅकफूटवर फेकले. यशस्वीने पदार्पणात अर्धशतक झळकावून मोठ्या विक्रमाची नोंद केली. १९७१ नंतर भारताच्या सलामीवीराने वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणात ५०+ धावा करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. 

यशस्वी जैस्वालची फिफ्टी; नोंदवले ४ मोठे विक्रम, रोहितसोबत १७ वर्षांनंतर केला मोठा पराक्रम

विंडीजचा पहिला डाव १५० धावांत गडगडला. आर अश्विनने २४.३-६-६०-५ अशी स्पेल टाकली. रवींद्र जडेजाने ३ तर मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या. यशस्वी जैस्वाल व रोहित शर्मा या नव्या जोडीने भारताला चांगली सुरूवात करून दिली. यशस्वीने पदार्पणात अर्धशतक पूर्ण केले. त्याने १०४ चेंडूंत ७ चौकारांच्या सहाय्याने ही खेळी केली अन् रोहितसह शतकी भागीदारीही पूर्ण केली.  रोहित शर्मा आणि यशस्वी ही ओपनिंग जोडी वेस्ट इंडिजविरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये १७ वर्षानंतर शतकी भागीदारी करणारी पहिली भारतीय जोडी ठरली. यापूर्वी २००६ मध्ये वसीम जाफर व वीरेंद्र सेहवाग यांनी हा पराक्रम केला होता. रोहितनेही १५वे अर्धशतक झळकावले. 

वेस्ट इंडिजमध्ये कसोटी पदार्पणात ५०+ धावा करणारा यशस्वी दुसरा भारतीय ठरला. १९७१ मध्ये सुनील गावस्कर यांनी दोन्ही डावांत ५०+ धावा केल्या होत्या. यशस्वीने हा पराक्रम करताच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, विराट कोहली, केएस भरत आणि इशान किशन यांनी उभं राहून टाळ्यांचा कडकड़ाट केला. (IND vs WI 1st Test Live Scoreboard ) 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजयशस्वी जैस्वालसुनील गावसकर
Open in App