Join us  

१६ चौकार,१ षटकार! यशस्वी जैस्वालची कामगिरी दमदार, मोडला सुनील गावस्करांचा 'युवा' विक्रम

IND vs WI 1st Test Live updates Marathi : २१ वर्षीय यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) याने कसोटी पदार्पण अविस्मरणीय बनवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 8:41 PM

Open in App

IND vs WI 1st Test Live updates Marathi : २१ वर्षीय यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) याने कसोटी पदार्पण अविस्मरणीय बनवले. रोहित शर्मासोबत सलामीला येताना २२९ धावांच्या भागीदारी नंतर युवा फलंदाजाने चांगला खेळ केला. विराट कोहलीसोबतची त्याने शतकी भागीदारी केली. त्याची ही फटकेबाजी तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात रोखण्यात वेस्ट इंडिजला अखेर यश मिळाले. यशस्वी ३८७ चेंडूंत १६ चौकार व १ षटकारांसह १७१ धावांवर झेलबाद झाला. पण, त्याने सुनील गावस्कर यांचा १९७१ साली नोंदवलेला युवा फलंदाजाच विक्रम मोडला. 

यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांच्या शतकानंतर विराट कोहली दमदार खेळ केला. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील १५० धावांच्या प्रत्युत्तरात रोहित ( १०३) - यशस्वी जोडीने २२९ धावांची भागीदारी केली. शुबमन गिल ६ धावांवर बाद झाला. विराटलाही सुरुवातीला जीवदान मिळाले आणि त्याने दिवसअखेर यशस्वीसह २०८ चेंडूंत ७२ धावा जोडल्या.  कालच्या नाबाद १४२ धावांवरून पुढे खेळताना यशस्वीने आज १५० धावा पूर्ण केल्या. कसोटी पदार्पणात भारताकडून १५०+ धावा करणारा यशस्वी तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी शिखर धवन ( १८७ वि. ऑस्ट्रेलिया २०१३) आणि रोहित शर्मा ( १७७ वि. वेस्ट इंडिज, २०१३) यांनी असा पराक्रम केला होता. 

विराटला ४० धावांवर आणखी एकदा जीवदान मिळाले. त्याचा सोपा झेल विंडीजच्या खेळाडूने टाकला. त्यानंतर तो रन आऊट होता होताही वाचला. विंडीजच्या १५० धावांच्या प्रत्युत्तरात एकट्या यशस्वीने १५०+ धावा केल्या. विराट व यशस्वी या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून विंडीजचे टेंशन वाढवले. यशस्वी ३८७ चेंडूंचा सामना करून १७१ धावांवर झेलबाद झाला. अल्झारी जोसेफने ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. (IND vs WI 1st Test Live Scoreboard )  यशस्वीचे दमदार विक्रम.... 

  • भारताकडून कसोटी पदार्पणात १५०+ धावा करणारा यशस्वी सर्वात युवा फलंदाज ठरला. त्याने ( २१ वर्ष व १९७ दिवस) त्याने सुनील गावस्कर ( २२० वि. वेस्ट इंडिज, १९७१) २१ वर्ष व २७७ दिवसांचा विक्रम मोडला. या विक्रमात माधव आपटे २० वर्ष व १३७ दिवसांसह ( १६३* वि. वेस्ट इंडिज, १९५३) हे अव्वल स्थानी आहेत.
  •  कसोटी पदार्पणात सर्वाधिक चेंडूंचा सामना करणाऱ्या ओपनरचा विक्रमही त्याच्या नावे नोंदवला गेला आहे. त्याने आतापर्यंत ३८७ चेंडूंचा सामना केला आहे. न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवेने २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३४७ चेंडूंत २०० धावा केल्या होत्या. त्याने १९९२ साली अँड्य्रू हडसन ( १६३ धावा ३८४ चेंडू) यांचाही विक्रम मोडला.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजयशस्वी जैस्वालसुनील गावसकर
Open in App