IND vs WI 1st Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या कसोटीला बुधवारपासून सुरूवात होत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२३-२५ या टप्प्यातील भारताची ही पहिलीच कसोटी मालिका आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंची फौज घेऊन भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर दाखल झाला आहे. युवा खेळाडूंना सोबत घेऊन भारताला ही मालिका जिंकायची आहे.
चेतेश्वर पुजाराच्या जागी कोणाला संधी मिळते हा खरा पेच संघ व्यवस्थापनासमोर आहे. याचे उत्तर कर्णधार रोहितने दिले आहे. यशस्वी जैस्वालसह रोहित ओपनिंगला येणार आहे. शुबमन गिलने स्वतः तिसऱ्या क्रमांकावर खेळायचे आहे अशी विनंती राहुल द्रविडकडे केली होती आणि ती मान्य झाल्याचे रोहितने सांगितले. त्याशिवाय या खेळपट्टीचा आधीचा अनुभव लक्षात घेता दोन फिरकी आणि तीन जलदगती गोलंदाज प्लेइंग इलेव्हनमध्ये असतील असेही रोहित म्हणाला. भारतीय संघ बऱ्याच वर्षांपासून लेफ्ट राईट कॉम्बिनेशनच्या शोधात होता आणि आता सलामीला तसेच चित्र दिसेल.
रोहितच्या सांगण्यानुसार तो आणि यशस्वी सलामीला त्यानंतर गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन/ के एस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयदेव अशी टीम असू शकते.
भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे ( उप कर्णधार), केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी. वेस्ट इंडिजचा संघ - क्रेग ब्रेथवेट ( कर्णधार), जर्मेन ब्लॅकवूड ( उप कर्णधार), एलिक एथानाझे, तागेनरीन चंद्रपॉल, रहकिम कोर्नवॉल, जोशूआ सिल्वा, शेनॉन गॅब्रीएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेंझी, रेयमन रेइफेर, केमार रोच, जोमेल वॉरिकन.