Video: वेस्ट इंडिजचा डाव गडगडला, शुबमन गिल फिल्डिंग करता-करताच गाण्यावर थिरकला

Shubman Gill Dance Video: विंडिजच्या फलंदाजीच्या वेळी घडला धमाल किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 09:07 AM2023-07-13T09:07:48+5:302023-07-13T09:08:12+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 1st Test Shubman Gill dance on the ground while fielding team india | Video: वेस्ट इंडिजचा डाव गडगडला, शुबमन गिल फिल्डिंग करता-करताच गाण्यावर थिरकला

Video: वेस्ट इंडिजचा डाव गडगडला, शुबमन गिल फिल्डिंग करता-करताच गाण्यावर थिरकला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shubman Gill Dance Video, IND vs WI 1st Test: कॅरिबियन देश आणि तिथलं वातावरण हे नेहमीच वेगळं असतं. तिथले वातावरण थंडगार असतं. ड्वेन ब्राव्हो असो की ख्रिस गेल, वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू पार्टी करण्याबरोबरच खेळण्यातही मागे नाहीत. क्रिकेटच्या मैदानावरही त्यांची पद्धत अनोखी आहे. पण नव्या विंडिज संघात मात्र तसे दर्जेदार खेळाडू नसल्याचे दिसते. पण असे असले तरी भारतीय संघाचे युवा खेळाडू मात्र दमदार आहेत. आणि फलंदाजीसोबत नृत्यातही त्यांची खास शैली आहे. कॅरेबियन खेळाडू नाचण्याची संधी शोधत असतात तसेच भारतीय खेळाडूंवरही कॅरेबियन वातावरणाचा परिणाम होताना दिसतोय.

भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल हा बहुतांशी क्रिकेटच्या मैदानावर गंभीर दिसतो. गिल त्याच्या खेळावर खूप लक्ष केंद्रित करतो. पण कॅरेबियन देशात गेल्यानंतर तो स्वत:ला रोखू शकला नाही. भारतीय संघ डोमिनिका येथे वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने 9 विकेट्स घेतल्या होत्या. गिल सिली पॉइंटवर क्षेत्ररक्षण करत होता. षटकाच्या मध्यावर मैदानावर गाणी वाजू लागली. शुभमन गिल स्वत:ला थांबवू शकला नाही आणि तो तिथेच नाचू लागला. त्याचा हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे.

वेस्ट इंडिजला केवळ 150 धावाच करता आल्या!

पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 150 धावांत गारद झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी चहापानाच्या विश्रांतीनंतर भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला ऑल आऊट केले. वेस्ट इंडिजकडून एलिक अथानाजने सर्वाधिक ४७ धावांचे योगदान दिले. ही एलिकची पदार्पण कसोटी आहे. भारतासाठी फिरकी गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. रवींद्र जडेजाने 3 तर अश्विनने 5 फलंदाजांना बाद केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 80 धावा केल्या आहेत. संघात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल हे दोन्ही सलामीवीर अजूनही क्रीजवर आहेत. वेस्ट इंडिजकडे आता पहिल्या डावात केवळ 70 धावांची आघाडी आहे.

Web Title: IND vs WI 1st Test Shubman Gill dance on the ground while fielding team india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.