Join us  

IND VS WI : फिरकीपटू कुलदीप यादवसाठी 2018 लकी, केली विक्रमी कामगिरी 

भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विजयासमीप पोहोचला आहे. भारताने पहिल्या डावात उभ्या केलेल्या 649 डावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 181 धावांवर गडगडला, तर दुसऱ्या डावातही चहापानापर्यंत त्यांचे 8 फलंदाज 185 धावांवर माघारी परतले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 2:46 PM

Open in App

राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विजयासमीप पोहोचला आहे. भारताने पहिल्या डावात उभ्या केलेल्या 649 डावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 181 धावांवर गडगडला, तर दुसऱ्या डावातही चहापानापर्यंत त्यांचे 8 फलंदाज 185 धावांवर माघारी परतले होते. त्यामुळे भारताचा डावाने दणदणीत विजय निश्चित मानला जात आहे. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याने या सामन्यात नवा विक्रम नावावर केला.

कुलदीपने विंडीजच्या पाच फलंदाजांना अवघ्या 57 धावांवर बाद केले. या कामिगिरीसह चालू वर्षात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पाच बळी टिपण्याचा विक्रम नावावर केला. त्याने इंग्लंडविरुद्ध ट्वेंटी-20 आणि वन डे सामन्यात अनुक्रमे 5 बाद 24 आणि 6 बाद 25 अशी कामगिरी केली होती. त्यात त्याने शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पाच विकेट घेतल्या. एका वर्षात तिन्ही फॉरमॅटमध्ये एका सामन्यात पाच बळी टिपणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.

तिन्ही प्रकारात पाच विकेट घेणारा तो एकूण सातवा आणि भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी न्यूझीलंडचा टीम साऊदी, श्रीलंकेचा लसिथ मलिंगा, अजंता मेंडिस, पाकिस्तानचा उमर गुल, भारताचा भुवनेश्वर कुमार आणि दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहीर यांनी अशी कामगिरी केली आहे.   

टॅग्स :कुलदीप यादवभारत विरुद्ध वेस्ट इंडिज