KL Rahul return, IND vs WI, 2nd ODI : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा वन डे सामना ९ तारखेला होणार आहे. भारताने पहिली वन डे ६ विकेट्स राखून जिंकताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. लोकेश राहुलच्या अनुपस्थित आणि शिखर धवन व ऋतुराज गायकवाड यांना कोरोना झाल्यामुळे पहिल्या सामन्यात रोहित शर्मासोबत इशान किशन सलामीला मैदानावर उतरला. कर्णधार रोहित व इशान यांनी चांगली सुरुवात करून दिली. पण, आता लोकेश राहुल परतला आहे. लोकेश व मयांक अग्रवाल यांचे नेट्समध्ये सराव करतानाचे फोटो BCCI ने पोस्ट केले आहेत. लोकेशच्या पुनरागमनामुळे आता दुसऱ्या वन डे सामन्यात कोणाचा पत्ता कट होईल, याची चर्चा सुरू झाली आहे.
भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यासाठी सोमवारी नेट्समध्ये सराव केला. नवदीप सैनीही कोरोनावर मात करून परतला आहे. ''बघा कोण परतलं आहे... या तिघांनी भारतीय संघाच्या नेट्समध्ये सहभाग घेतला आणि कसून सराव केला,''असे ट्विट BCCI ने केले.
वैयक्तिक कारणास्तव राहुल पहिल्या सामन्याला खेळू शकला नव्हता, तर मयांक क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून मैदानावर उतरला आहे.
कोणाचा पत्ता होणार कट?
अशात आता दुसऱ्या वन डे सामन्यात इशान किशन किंवा दीपक हुडाला बाकावर बसवले जाऊ शकते. इशानने पहिल्या वन डे त २८ धावा करताना रोहितसह पहिल्या विकेटसाठी ८४ धावा जोडल्या होत्या. तर दीपकने नाबाद २६ धावांची खेळी करताना सूर्यकुमार यादवसह पाचव्या विकेटसाठी ६२+ धावा जोडून संघाचा विजय पक्का केला होता. या दोघांपैकी एकाला बाकावर बसवले जाऊ शकते. जर दीपक हुडाला बसवले तर इशान मधल्या फळीत खेळेल आणि रोहित व लोकेश सलामीला खेळतील.
Web Title: IND vs WI, 2nd ODI : KL Rahul, Mayank Agarwal join Indian camp; Navdeep Saini returns from Covid isolation, know probable playing XI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.